शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:05 IST

परिपत्रक वाचन : मालपूरच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची मागणी

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील सेंट्रल बँकेत सुलभ पीक कर्ज अभियान अंतर्गत सुलभ पीक कर्ज मेळावा घेण्यात आला. यात पात्र लाभार्थ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करुन देणे अभिप्रेत असल्याचे सांगण्यात आले.शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेती सुधारण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी बँकेत तसेच विविध कार्यकारी सोसायटीत अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. शेतकरी कंटाळून मेटाकुटीस येतात. तर काही ठिकाणी दलालांना हाताशी धरल्याशिवाय कर्जप्राप्ती होत नाही.यासाठी शासनाने एक परिपत्रकच काढले असून पात्र शेतकºयांना त्वरित कर्ज उपलब्ध होण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामीण तालुका व जिल्हा पातळीवर समित्यांचे देखील गठन करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमुद आहे.मालपूर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेच्या या अभियान अंतर्गत मेळावा घेवून परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. यात चालू वर्षीचा खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाची तात्काळ उपलब्धता करा असे सांगण्यात आले. अन्वये महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजने अंतर्गत निर्धारीत केलेल्या अटीनुसार पात्र थकबाकीत असलेल्या कर्जदार शेतकºयांना कर्जमाफी दिलेली असल्याने असे शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र झालेले आहेत. तरी अशा शेतकºयांनी देखील बँकेकडे कर्ज मागणी करावी. जास्तीत जास्त शेतकºयांना तात्काळ कर्ज द्या, नियमित कर्ज परतफेड करणाºया त्वरित पीक कर्ज वाटप करा, नव्याने सभासद झालेल्या शेतकºयांनाही लाभ द्यावा, अशा या योजनेची उद्दिष्टे आहेत.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपककुमार होते. कृषी अधिकारी स्वप्नील पाटील, तलाठी बी.एस. चव्हाण, समन्वयक अशोक सूर्यवंशी, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव रवींद्र पाठक, देविदास पद्भोर, सरपंच मच्छिंद्र शिंदे, रोखापाल जे.एस. निकुम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या मेळाव्याला मालपूर, सुराय, अक्कलकोस, कर्ले, देवी, सतारे, वाडी, रेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे