धुळे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ४ रोजी शहरासह जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. त्यांच्या उपस्थित कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या मागील बाजूस मंडपाची उभारणी केली जात असून त्याची पाहणी महापालिकेसह पोलीस अधिकारी यांनी केली.यावेळी आयुक्त अजिज शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक नागसेन बोरसे, कमलेश देवरे, नगरसेविका भारती माळी आदिंची उपस्थिती होती.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापालिकेला भेट द्यावी, अशी मागणी आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, भिकन वराडे यांनी केली होती. त्यांची मागणी राज्यपाल कोश्यारी यांनी मान्य केली.
राज्यपालांच्या दौऱ्याची अधिकाऱ्यांकडून तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 22:45 IST