शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील खरीप आढावा बैठक लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:10 IST

मतदान झाल्यानंतर बैठक होण्याची शक्यता

ठळक मुद्देदरवर्षी एप्रिलमध्येच होत असते आढावा बैठकबैठकीत कृषी विभागाचे वर्षभराचे होते नियोजन

आॅनलाइन लोकमतधुळे : खरीप हंगामाची रूपरेषा ठरविण्यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यातच जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक होत असते. मात्र यावर्षी निवडणुका असल्याने, खरीप आढावा बैठक लांबलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनासाठी मे महिना उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरवर्षी एप्रिल महिन्यात खरीप आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असते. या बैठकीत राष्टÑीयकृत, खाजगी बॅँकानी वितरीत केलेल्या कर्जाचा तपशील, बॅँकानी कर्ज वितरणासाठी निश्चित केलेले लक्षांक,खरीप हंगामासाठी लागणारे रासायनिक खते, बियाणे, किती हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे, याची आकडेवारी सादर करण्यात येत असते. त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजना, हवामान आधारित पथदर्शक पीक विमाग योजना, रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम, राष्टÑीय फलोत्पादन अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, शासकीय दूध योजना आदींविषयी माहिती देवून त्याचे नियोजन करण्यात येत असते.एप्रिल महिन्यातच ही बैठक होत असल्याने, नियोजन करणे फायदेशीर ठरत असते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून असल्याने, त्याचबरोबर सर्वच शासकीय कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने खरीप आढावा बैठक अद्याप होऊ शकलेली नाही. धुळे लोकसभा मतदार संघात २९ रोजी मतदान आहे. तोपर्यंत ही बैठक होणे शक्य नाही. त्याचबरोबर २३ मे रोजी मतमोजणी आहे. या दरम्यान खरीप आढावा बैठक होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे