शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्यांच्या हस्ते केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:52 IST

थाळनेर : शाळा परिसरात केले वृक्षारोपण, दरवर्षी वृक्ष लागवड करण्याचा घेतला संकल्प

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी नवदामपत्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. दरवर्षी लग्नाचा वाढदिवस वृक्षारोपणाद्वारे साजरा करण्याचा संकल्प त्यांनी घेतला.थाळनेर येथील वसंत संपतराव पानसरे यांची कन्या योगिनी व नागपूर येथील कै.गोपालराव भागवतराव देवकर यांचे चिरंजीव ओंकार यांच्याशी रविवारी शिरपूर किसान विद्या प्रसारक संस्था संचालित थाळनेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात   विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीलाच या नवदामपत्यांनी मोठा उपक्रम हाती घेतल्याने समाजात त्यांचे कौतुक केले जात आहे.यावेळी वर वधू च्या आग्रहास्तव विद्यालयाच्या प्रांगणात वड व निंब अशा दोन वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाने घेतली आहे. यावेळी नवदाम्पत्यांने आपला लग्नाचा वाढदिवस अशापद्धतीने वृक्षारोपण करुन दरवर्षी साजरा करण्याचा संकल्पही घेतला. अशा प्रकारे सर्वत्र उपक्रम राबविले गेले तर निश्चितच वातावरणात होणारा बदल हा काही प्रमाणात कमी होईल अशी प्रतिक्रिया लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवरांनी व्यक्त केली.

टॅग्स :Dhuleधुळे