शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जनहित याचिकाकर्त्यांना लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:47 IST

उच्च न्यायालय : शिरपूर साखर कारखाना प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर साखर कारखाना प्रकरणी दाखल जनहित याचिकेमध्ये याचिकाकर्ते अशोक विठोबा श्रीराम व मोहन साहेबराव पाटील व इतर ३ जणांनी महत्वाची माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांना एक लाख रूपयांचा दंड (कॉस्ट) ठोठावण्यात आला़उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल करून शिरपूर साखर कारखानामध्ये झालेला तथाकथित अपहारासंदर्भात शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली होती. सदर जनहित याचिका ३० नोव्हेंबर २०१८ रोजी न्यायालयाने निकाली काढली़ कृषी व सहकार नवी दिल्ली यांनी तसेच सहकार आयुक्त पुणे यांनी तक्रारदारांचा अर्ज हा सहा आठवड्याच्या आत निकाली काढावा असे आदेश देवून सदर जनहित याचिका निकाली काढली. त्यानंतर याचिकाकर्ते अशोक श्रीराम व मोहन पाटील यांनी सदरील आदेशाचा विपर्यास करून उच्च न्यायालयाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मुभा दिली अशा आशयाच्या बातम्या या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केल्या होत्या. सदरील बातम्या प्रकाशित झालेनंतर कारखान्यांचे तत्कालीन संचालक मंडळ यांनी सदरील जनहित याचिकेचे संपूर्ण कागदपत्रे मिळविली़याचिकाकर्ते यांनी सदरील प्रकरणी उच्च न्यायालयापासून महत्वाच्या गोष्टी लपवून ठेवून सदरील आदेश प्राप्त करून घेतलेले आहेत. त्यामुळे कारखान्यांचे तत्कालीन चेअरमन वसंतराव उत्तमराव पाटील, व्हाईस चेअरमन बबन रावजी चौधरी व इतर संचालकांनी अ‍ॅड.अजय तल्हार यांचे मार्फत उच्च न्यायालयामध्ये दिवाणी अर्ज दाखल केला़अशोक श्रीराम व मोहन पाटील यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली व प्रत्येकी ५० हजार रूपये हे सहा आठवड्यात उच्च न्यायालयात जमा करणेचे हमीपत्र दिले. सदरील प्रकरणी चेअरमन वसंतराव पाटील व व्हाईस चेअरमन बबन चौधरी व इतर संचालकांतर्फे अ‍ॅड.अजय तल्हार यांनी काम पाहिले़ त्यांना अ‍ॅड.प्रमोद गायकवाड, अ‍ॅड.सीमा पवार, अ‍ॅड.तुषार डवरे व अ‍ॅड.पुष्पक गुजराथी यांनी सहकार्य केले.

शिरपूर साखर कारखान्यात मागील संचालक मंडळाच्या काळात १६ कोटी रूपये साखर विक्रीचा बेकायदेशीर व्यवहार झाल्यामुळे कारखाना जप्त झाला होता़ त्यामुळेच आम्ही हायकोर्टात पिटीशन दाखल केले आहे, त्या भीतीने मागील संचालक कोर्टात गेले़ आम्हाला कोर्टाने १ लाख रूपये कॉस्ट भरण्यास सांगीतले आहे़ आम्ही कॉस्ट रक्कम भरू, परंतु पिटीशन मागे घेणार नाहीत़ आता कोर्टाच्या आदेशानुसार चौकशी होणार आहे़ कोर्टाने फौजदारी करण्याची मुभा दिलेली आहे़ परंतु आम्ही घाई-घाईत निर्णय घेणार नाही़ चौकशी सुरू आहे, लवकरच दुध का दुध व पाणी का पाणी होणार असल्याने संबंधीत चेअरमन व  व्हाईस चेअरमन यांना जेलचा रस्ता दाखविणाऱ त्यांनी शेतकरी व कामगारांचा पैसा हडप केला आहे, त्यामुळे त्यांना सोडणार नाहीत़- मोहन साहेबराव पाटील, याचिकाकर्ते

टॅग्स :Dhuleधुळे