शासनाने नियम शिथिल करीत आता व्यवहार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे शहरातील बाजारपेठेत दुकाने ४ वाजेपर्यतच सुरू ठेवता येणार आहेत. तर नागरिकांना ५ वाजेपर्यंत शहरात फिरण्याची परवानगी आहे. मात्र, ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही काही दुकानदार वेळेचे उल्लंघन करीत ४ वाजल्यानंतरही दुकाने सुरू ठेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानात व बाजारपेठेत गर्दी होत आहे. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने सोमवारी महापालिकेच्या पथकाने दुकानदारांवर कारवाई केली आहे. सोमवारी सायंकाळी करण्यात आलेल्या कारवाईत राणा प्रताप चौकात ईश्वर गारमेंट, न्यू सेवक साडी, शाह सॅनिटेशन, क्रिश गारमेंट, श्रीराम पेन यांची दुकाने उघडी असल्याने प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. कारवाई अतिक्रमण पथक प्रमुख प्रसाद जाधव, लिपीक संतोष घटी, युवराज खरात, जाकीर बेग, दीपक पगारे, अकील शेख, पोलीस कर्मचारी नीलेश राऊत, कृष्णा पाटील, सचिन भालेराव यांचा पथकात समावेश आहे.
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ दुकानदारांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST