शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्याची गाडी जाळली

By admin | Updated: February 6, 2017 00:20 IST

शिरपूर शहरातील शास्त्रीनगरात मध्यरात्रीची घटना

शिरपूर :  शहरातील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली कार शनिवारी मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी जाळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अज्ञात आरोपीविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   गेल्या 14 वर्षापासून प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील हे शास्त्रीनगर मधील प्लॉट क्रमांक 35 येथे राहत आहेत. त्यांच्या  बंगल्याच्या संरक्षक भिंतीलगत त्यांची कार (एमएच 18- एजे 5661) नेहमीप्रमाणे लावली होती़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. पेटत्या गाडीतून मोठा आवाज झाल्याने डॉ़ पाटील यांच्या मुलीच्या लक्षात आले. तिने घरातील लोकांना सांगितल़े तसेच गाडी पेटत असल्याचे जवळील लोकांना सांगितल्यानंतर त्यांनी पाणी टाकून कार विझविण्याचा प्रय} केला. 15 मिनिटात पोलीस घटनास्थळी ही कार जळण्यापूर्वी पोलिसांची गस्त शास्त्रीनगरजवळील एका कॉलनीत होती. त्यांना कार जळाल्याची माहिती मिळताच, अवघ्या 15 मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  तेव्हा कारच्या बाजूलाच पेट्रोलची रिकामी बाटली आढळून आली. ती बाटली पोलिसांनी ताब्यात घेतली आह़े कारचे इंजीन खाक;  4 लाखांचे नुकसान आर.सी. पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व पोलीस निरीक्षक  दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत प्राचार्य डॉ. पाटील यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण कारचे इंजीन पूर्णपणे जळून खाक झाले आहे.  याबाबत प्राचार्य डॉ़ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम 435 प्रमाणे शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.