शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवान चंदू चव्हाणचा डॉ.भामरे यांच्या प्रचारात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:03 IST

आदेशाचा भंग, निवडणूक निर्णय अधिका-यासह आयोगाकडे तक्रार : अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती 

ठळक मुद्देचंदू चव्हाणचा प्रचारात सक्रिय सहभागाची तक्रारनिवडणूक आयोगाच्या सूचना, आदेशाची पायमल्लीडॉ.सुभाष भामरे यांची उमेदवारी रद्दबातल करण्याची मागणी 

लोकमत आॅनलाईन धुळे : शत्रू राष्टÑात आश्रयास गेलेल्या चंदू चव्हाण यास भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी आपल्या निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतले. जामफळ येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमातही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. ९ रोजी झालेल्या डॉ.भामरे यांच्या शक्तीप्रदर्शन रॅलीतही तो सहभागी झाला होता.याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी व केंद्र, राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.पुलवामा अतिरेक्यांचा हल्ला, त्यात ४४ जवानांना पत्करावे लागलेल्या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सैन्याच्या गणवेशाचा वापरही नियमबाह्य व बेकायदेशीर मानला आहे. तसेच सेनेमध्ये कार्यरत कुठल्याही जवानाचा प्रचारात वापर करणे किंवा सहभागी करून हा गंभीर गुन्हा असल्याच्या सूचना व सैन्याचा वापर केल्यास उमेदवारास गंभीर स्वरुपाचे परिणाम भोगावे लागतील, अशी सक्त ताकीद आयोगाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.भामरे यांनी आयोगाच्या सर्व सूचनांची पायमल्ली केली असून त्याची रितसर तक्रार आपण निवडणूक निर्णय अधिकारी व आयोगाच्या आयुक्तांकडे केल्याचे गोटे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत यावेळी तेजस गोटे, दिलीप साळुंखे, हिंमत पवार, प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते.  व्हॉट्सअपनेही प्रचार एवढेच नव्हे तर चंदू चव्हाण याच्या व्हॉट्सअप अकौंटवरून डॉ.भामरे यांना मतदान करून निवडून आणावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचा डॉ.भामरे यांनी इन्कारही केलेला नाही. तक्रारीसोबत पुराव्यादाखल चित्रफीत व चंदू चव्हाण यांच्या व्हॉट्सअप अकौंटवरील प्रिंट आऊटची प्रत देखील जोडली आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू असताना संरक्षण राज्यमंत्री पदावर असताना डॉ.भामरे यांनी केलेले हे कृत्य गंभीर आहे. ते लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी रद्दबातल ठरविण्याची शिफारस करावी, अशी मागणीही आपण निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावारांकडे केल्याचही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण