शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी पाल्याचा कल लक्षात घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 11:34 IST

जानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे बक्षीस वितरण

ठळक मुद्देजानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे वर्षभरात घेतल्या विविध स्पर्धास्पर्धेतील १४० विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

आॅनलाइन लोकमतधुळे : पालकांनी आपल्या पाल्याच्या कल लक्षात घेऊन त्याला त्याच्या विषयातील शिक्षण कशा रीतीने प्राप्त होऊ शकेल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत ज्येष्ठ विधिज्ञ जे.टी.देसले यांनी येथे व्यक्त केले.जानकीबाई देशपांडे वाचनालयाच्यावतीने आयोजित स्पर्धाच्या ३९ व्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात सत्कारर्योत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद चितळे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.जानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे वर्षभरात सूर्यनमस्कार, मनाचे श्लोक, चित्रकला, योगासन, पाठांतर या स्पर्धा सांघिक व वैय्यक्तिकस्तरावर घेण्यात आल्या. त्यातील १४० विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.अ‍ॅड. देसले म्हणाले की, विद्यार्थी, तसेच सैनिकांना शासनाने अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कारण हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य ठेवावे, अपयश मिळाले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा असा सल्ला दिला. यशस्वी होण्यासाठी माजी राष्टÑपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे तसेच क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांचे त्यांनी उदाहरण दिले.अध्यक्षीय भाषणात डॉ. विवेकानंद चितळे म्हणाले, एखादे कार्य सातत्याने करायचे असेल तर चिकाटी असली पाहिजे. चिकाटी ठेवली तर यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सांघिक स्पर्धेत प्रथम आलेल्यांना फिरती ढाल तर वैय्यक्तिक स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पुस्तक भेट देण्यात आले.प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष व.रा.जोशी यांनी केले. स्पर्धेचा अहवाल वाचन कार्यवाह सतीष दीक्षित, पाहुण्यांचा परिचय मंदिराचे कार्याध्यक्ष प्रा.देवेंद्र डोंगरे तर सूत्रसंचालन राजश्री शेलकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे