शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनामुळे पांझरा नदी झाली प्रवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:17 IST

ऐन दुष्काळात शहरवासियांना दिलासा : अक्कलपाडा धरणातून आतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले

धुळे : गेल्यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांमध्ये पाणीच शिल्लक नाही. भीमा, कृष्णा, गोदावरी, तापी यासारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रांमध्येही उन्हाळ्यात काही ठिकाणी ठणठणाट आहे. धुळे जिल्हयातून वाहणाऱ्या पांझरा नदीचे पात्रही पावसाळ्यातही कोरडठाक होते. मात्र नुकतेच अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे पांझरा नदी ऐन दुष्काळातही वाहत असल्याचे दिलासादायक चित्र बघावयास मिळत आहे. ऐन टंचाईच्या काळात नदी खळखळून वाहन आहे.गेल्यावर्षी झालेल्या अल्पशा पावसामुळे ऐन पावसाळ्यातही पांझरा नदीला पूर आला नव्हता. याचवर्षी अक्कलपाडा धरणातून सोडलेल्या आवर्तनाचा कालावधी वगळता नदीपात्र गेल्या दीडवर्षांपासून कोरडेठाक पडलेले होते. नदीत स्वच्छ पाण्याऐवजी गटारीचेच पाणी जास्त आहे. त्यामुळे पांझरा नदी की गटारगंगा असाही काहींना प्रश्न पडत असतो.पांझरा नदीकिनारी धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आहेत. पांझरा नदी किनारी असलेल्या गावांना गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने गेल्या शुक्रवारी (दि.१० मे) अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात ३२५ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले असून, अजून २०० टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. सद्यस्थितीत धरणातून प्रत्येक सेकंदाला ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.धरणातून सोडलेले पाणी तीन दिवसानंतर म्हणजे सोमवारी शहरात पोहचले.शहरातही पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्यासाठी काही भागात नागरिकांची भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत कोरड्या असलेल्या पांझरा नदीपात्रात पाणी आले आहे.भर उन्हाळ्यातही नदीपात्र प्रवाही झाल्याचे बघून अनेकांना दिलासा मिळालेला आहे. बारामाही वाहणाºया राज्यातील काही नद्यांचे पात्र कोरडे पडलेले असतांना पांझरा नदीत पाणी वाहत असल्याचे आल्हादायक चित्र शहरात बघावयास मिळत आहे. नदी वाहते आहे म्हणून काहीजण सायंकाळी नदीलगत फिरायला येऊ लागले आहेत. नदीचा खळखळाट अनेकांना आकर्षिक करू लागला आहे.अस्वच्छता वाहून गेलीनदीत पाणी आल्याने, पात्रात गेल्या काही दिवसांपासून साचलेली घाण वाहून गेलेली आहे.मासेमारीही सुरूनदी कोरडी असतांनाही त्या ठिकाणी असणाºया डबक्यातून काहीजण मासे पकडत असतात. आता आवर्तन सोडल्यामुळे नदी प्रवाही झाल्याने, नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी काहीजण सरसावले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे