५१ वर्षीय माध्यमिक शिक्षक ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आणि संपूर्ण शाळेचे वातावरण चिंताग्रस्त झाले. २८ मार्चला कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी ठाकरे मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेो असता डॉक्टरांनी ताप असल्यामुळे लस देता येणार नाही असे सांगितले. ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यायचा सल्ला दिल्याने, रॅपिड अँटिजन टेस्ट केली असता ती निगेटिव्ह निघाली; मात्र ताप काही कमी होईना. यामुळे ते दोंंडाईचा येथील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले. त्यानी सर्व तपासण्या केल्या असता त्यावेळी त्यांचा सीआरपी स्कोर ९१ आला. डाॅक्टरांनी एचआरसीटी सांगितले असता, त्याचा स्कोर १८ आला. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यानंतर बेडची शोधाशोध सुरू झाली. एका खासगी दवाखान्यात त्यांना दाखल केले. मात्र त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. वेळेवर औषधोपचा आणि प्रबळ मनात इच्छाशक्ती तयार केली. कुटुंंबीयांसाठी आपल्याला जिवंत राहायचे आहे म्हणून स्वतःशी संघर्ष करण्याची खूणगाठ मनात बांंधली. यासाठी कुटुंबीय, मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच कोरोनावर मात करता आली असे त्यांनी सांगितले.
इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST