शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

घराचा मागील दरवाजा उघडून चार लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:10 IST

शिरपुरातील घटना : भावाकडे आलेल्या बहिणीला चोरट्यांचा हिसका

शिरपूर : शहरातील करवंद नाक्याजवळील शंकर पांडू नगरातील एका घराचा मागील दरवाजा उघडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली़ याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ भावाकडे आलेल्या बहिणीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे.ही घटना ३१ मेची रात्र ते १ जूनच्या पहाटे ६़३० वाजेच्या दरम्यान घडली़ येथील वीज महावितरण कंपनीचे आॅपरेटर किशोर शिरसाठ हे प्लॉट नंबर २१ शंकर पांडू नगरात राहतात़ त्यांच्याकडे त्यांची बहिण सरला सुकदेव शिंदे (३३) रा़चांदीका आक्का कॉलनी, यावल रोड, चोपडा ही पती व मुलांसह २६ तारखेला एका साखरपूडा समारंभासाठी आले होते़ त्यानंतर ते त्याच दिवशी रात्री कोकणात फिरण्यासाठी शिंदे व त्यांचे आप्तजण असे दोन परिवारासह रवाना झाले. ते फिरून आल्यानंतर पुन्हा ३० मे रोजी शिंदे कुटुंबिय शिरपूरला आले़ सुट्टी असल्यामुळे ते गावी न जाता येथेच थांबले़३१ रोजी किशोर शिरसाठ हे ड्यूटीवर गेल्यानंतर रात्री शिंदे कुटुंबिय घराच्या गच्चीवर तर शिरसाठ कुटुंबिय घराच्या पहिल्या हॉलमध्ये झोपले होते़ दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश मिळविला़ किचन रूममधील ठेवलेल्या एका कपाटातील डब्यामधून चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात ५ तोळे वजनाचा चपला हार, २ सोन्याचे नेकलेस, २ सोन्याच्या बांगड्या, अडीच तोळे वजनाच्या, ५ ग्रॅमचे कानातले, ३ ग्रॅम सोन्याचे रिंगा, १० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याच्या अंगठ्या, ३ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याचे पदक, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे असा एकूण ३ लाख ७९ हजार ५०० रूपयांच्या ऐवजाचा समावेश आहे.किशोर शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे