शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मृतिभ्रंश’च्या केवळ अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:50 IST

फॅक्टरी आग प्रकरण : सर्व जवान सुखरुप असल्याची माहिती

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटातील जखमी जवानांची प्रकृती स्थित आहे़ स्मृतीभ्रश झाल्याची केवळ अफवाच आहे़ अशी माहिती राज्य राखीव पोलिस दलाचे समादेश संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़वाघाडी गावाजवळील केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात १४ ठार तर ७२ जण जखमी झाले होते़ याप्रकरणी रूमीत केमिसिंथ (केमिकल्स) प्रा़लि़ कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही़ ३१ आॅगस्ट रोजी सकाळी झालेल्या स्फोटात १३ जणांचा जागीच मृत्यु तर ७२ जण जखमी झाले होते़ घटनेच्या तिसऱ्या दिवशी बेपत्ता असलेल्या एकाचा मृतदेह कंपनीपासून ५०० मिटरवर असलेल्या नाल्याच्या किनारी सापडला होता़ त्यामुळे या घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यु झाला आहे़ अद्यापही अनेक जखमी कामगार उपचार घेत आहेत़ कंपनीतील एका कामगारानेच या घटनेत कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून त्यांचे हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच सदरची घटना घडली़ त्यामुळे कंपनी व्यवस्थापन विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहेग़ुन्हा नोंदवून देखील ११ दिवस उलटले तरी पोलिसाकडून काहीच कारवाई झालेली नाही़ नेमके कशामुळे ही घटना घडली ते देखील अनुत्त्तरीतच आहे़ घटना घडल्यानंतर तेथील केमिकल्सचे ड्रम व पावडर अन्यथा हलविण्यात आले आहे़ सद्यस्थितीत तेथे वॉचमन वगळता कुणाही नाही़ दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल यांनी पटेल परिवाराकडून मृतांना प्रत्येकी ६० हजार रूपयांची आर्थिक मदत, जखमींना किराणा माल तर अनाथ झालेल्या पाल्यांचे शिक्षण व राहण्याचा सर्व खर्च करण्याचे जाहिर केले आहे़ रूमित केमिकल्स फॅक्टरी प्रशासनाने सुध्दा मृतांच्या कुटुंबासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी रोख २५ हजार रूपये दिलेत तर त्यांच्या वारसांना पुन्हा ५ लाख रूपयांचा निधी नुकताच तहसिल प्रशासनाच्या उपस्थितीत देण्यात आला़वाघाडीतील आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेले सर्व जवान सुखरूप आहेत़ स्मृतीभ्रंश वगैरे झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही़-संजय पाटील,राज्य राखीव पोलिस दल, समादेशक