सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सहावीच्या एकूण ४० जागांसाठी व सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या रिक्त असणाऱ्या जागांकरिता अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, तर दिव्यांग प्रवर्गासाठी ३ टक्के यानुसार आरक्षण आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शाळेचा दाखला, जातीचा दाखला मागील इयत्तेचे प्रगती पत्रक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साइज आकाराचे छायाचित्र, संचयी नोंद पत्रक (सहावी ते आठवीसाठी), आधार कार्ड, स्वास्थ्य प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
या आहेत सोयी-सुविधा...
मोफत निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट, तेल, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, क्रीडा साहित्य, आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी भाडणे शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला पानपाटील, सोनगीर शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता बेरड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बडगुजर यांनी केले आहे.