शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा ३०० रुपयांनी गडगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:07 IST

पिंपळनेर : उपबाजार समितीत २५० वाहनांचा लिलाव, दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत शुक्रवारी कांद्याच्या २५० वाहनांचा लिलाव झाला. यावेळी कांद्याला १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याचे दर पुन्हा कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली. आता दोन दिवस मार्केट बंद राहणार असून सोमवारी मार्केट पुन्हा सुरू होईल.पिंपळनेर उपबाजार समितीत गुरुवारी लिलावासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहने दाखल झाली होती. लिलावावेळी पाऊस येत असल्याने व वाहनांची संख्या प्रचंड असल्याने व्यापाºयांनी ४०० वाहनांचा लिलाव करून उर्वरित वाहनांचा शुक्रवारी लिलाव केला जाईल, असे सांगितले. यावेळी व्यापारी, शेतकरी व बाजार समिती प्रशासनाशी यावर चर्चा होऊन देखील लिलाव झाला नाही. यामुळे काही शेतकºयांनी आपली वाहने पुन्हा परत नेली तर काही शेतकरी बाजार समितीच्या आवारात रात्रभर कांद्याची वाहने उभी करून थांबले होते. यातील उर्वरित वाहनांचा लिलाव शुक्रवारी करण्यात आला. यावेळी २५० वाहने दाखल झाली होती. कांद्याला प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला तर सरासरी ११०० ते १३०० असा भाव होता.कोरोनामुळे वेळोवेळी लॉकडाऊन व साठवलेला कांदा चाळीत सडू लागल्याने यावर्षी शेतकºयांना मोठा आर्थिक फटका कांद्यात बसला आहे. त्यात गेल्या ८ दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, ही वाढ अल्पकाळ राहिली. त्यामुळे शेतकºयांच्या नशिबी निराशाच आली. कोरोना आजारामुळे शेतकºयांची आर्थिक बजेट कोलमडले असून उर्वरित कांद्याला २० रुपये तरी भाव मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकºयांनी केली होती. राज्य व केंद्र सरकार या मागणीकडे अद्यापही लक्ष देतांना दिसत नाही.शुक्रवारी बाजार समितीत कर्मचाºयांचा संप होता. मात्र, गुरुवारी पूर्ण लिलाव न झालेल्या वाहनांचा लिलाव शेतकºयांचे हित लक्षात घेऊन करण्यात आला. व्यापाºयांनीही सहकार्य केल्याने हा लिलाव झाल्याची माहिती सचिव अशोक मोरे व शाखा प्रमुख संजय बावा यांनी दिली.