शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गणपती पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 22:06 IST

देवपूरातील कंटेनमेंट झोनमुळे निर्णय : अत्यावश्यक वाहतुकीला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील वर्दळीचे पूल बंद करण्यात आले़ लहान पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु असतानाच गणपती मंदिराजवळील पूल दीड महिन्यांपासून बंद होता़ मात्र, देवपुरात कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने गणपती पूल एकेरी वाहतुकीसाठी सोमवारपासून खुला करण्यात आलेला आहे़देवपुरातील सुधा हॉस्पिटल ते सावरकर पुतळा पावेतोचा भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेला असल्याने देवपुरातील इंदिरागार्डन नकाणे रोड परिसरातील नागरिकांना सावरकर पुतळ्याकडे जाण्यात येणारा मार्ग बंद करण्यात आलेला आहे़ नागरिकांना आपत्कालिन व जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीदार, दुकानदार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची संख्या विचारात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही बदल करण्यात आलेले आहेत़त्यात ११ मे पासून गणपती मंदिर पुल हा मोराणकर यांच्या निवासस्थानापासून सिध्देश्वर हॉस्पिटल ते गणपती मंदिराकडे जाण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी एक मार्गी सुरु करण्यात आलेला आहे़ तसेच पांझरा नदीवरील सावरकर पुतळा ते शहराकडे येणारा पांझरा नदीवरील पूल हा देखील एकमार्गी खूला असणार आहे़ त्याचप्रमाणे शहरातून देवपूर परिसरात जाण्यासाठी कालिका माता मंदिर ते जयहिंद जलतरण तलाव या दरम्यान असलेला फरशी पूल हा एकमार्गी सुरु ठेवण्यात आलेला आहे़गणपती पुलावरुन वाहतुक सुरु केली असली नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़ शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे़ त्यामुळे लॉकडाउनमध्ये कोणतीही सवलत दिलेली नाही़ जीवनावश्यक वस्तुंची सेवा सुरु आहे़ परंतु नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे़ अन्यथा कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे़अत्यावश्यक सेवा पुरविणारे शासकीय अधिकारी कर्मचारी, अत्यावश्यक साधन सामुग्री वाहतूक करणारे वाहनधारक यांनी त्यांच्याकडील आवश्यक पुरावे पडताळून या पुलाचा वापर करण्याची परवानगी आहे़ याकामी पोलिसांना सहकार्य करावे़ आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल़- आऱ एम़ उपासेपोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे