शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

कुडाशी-पिंपळनेर रस्त्यावर रिक्षा उलटून अपघात, १ ठार, २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:35 IST

गतिरोधकाची मागणी : ५ दिवसापूर्वी ग्रामस्थांनी केला होता रास्तारोको

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील कुडाशी गावाकडून पिंपळनेरकडे येणारी अ‍ॅपेरिक्षा मानव केंद्राजवळ उलटली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.कुडाशी गावाकडून पिंपळनेरकडे येणाऱ्या एम.एच. ४१ सी.५४०१ क्रमांकाची अ‍ॅपेरिक्षा मानव केंद्राजवळ उलटली. त्यात लक्ष उत्तम घरटे (३० रा.पिंपळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद उत्तम घरटे (२८ रा.पिंपळनेर) व विशाल पुंडलिक गवळी (२८ रा.शिरवाडे) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जखमींना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घरटे यास मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. पिंपळनेर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.मागील आठवड्यात याच जागेवर एका मोटरसायकल चालकास पिकअप वाहने धडक दिली होती. या अपघात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळेस गतिरोधक बनवण्यासाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन देखील केले होते. सदर अपघाताची घटना घडून आता ५ दिवस उलटत नाही तोच दुसरी अपघाताची घटना घडल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. आता तरी बांधकाम विभाग गतिरोधक टाकण्याचे काम करेल का, असा सवाल नागरिक करीत आहेत.