शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आता मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरणे शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:19 IST

मनपा : प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लवकरच अंमलबजावणी होणार सुरू

धुळे : महापालिकेने क्रेडिट, डेबिट, एटीएम कार्डद्वारे कर स्वीकारण्यास प्रारंभ केल्यानंतर 18 दिवस उलटले असताना मनपा प्रशासनाने कर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे मंगळवारी जाहीर केल़े प्रशासकीय तयारी पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसात अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे आयुक्त संगीता धायगुडे, सहायक आयुक्त अभिजित कदम यांनी स्पष्ट केल़ेमहापालिका प्रशासनाने 2 फेब्रुवारीपासून वसुली विभागात सुरू असलेली चलन पद्धत पूर्णपणे बंद केली आह़े त्यामुळे मालमत्ता कराचे बिल थेट बँकेत भरणे शक्य झाले आह़े मालमत्ता कर भरण्यासाठी 10 पीओएस मशीन्स वसुली विभागाला उपलब्ध करून दिले असून त्याद्वारे मालमत्ताधारकांना आपले एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे कर भरणे शक्य होत आह़े सदर मशीन्सपैकी काही मशीन्स वसुली विभागात ठेवले जाणार असून उर्वरित मशीन्स घेऊन मनपाचे कर्मचारी आपापल्या भागातील नागरिकांकडून घरोघरी जाऊन कर भरून घेत आहेत़ पीओएस मशीन्सद्वारे कर भरल्यास पावती मिळणार असली तरी मूळ पावती वसुली विभागात एक दिवसानंतर उपलब्ध होत असून ई-मेल असलेल्या मालमत्ताधारकांना मूळ पावती ई-मेल वर दिली जाणार आह़ेदरम्यान, डेबिट, क्रेडिट कार्डच्या सुविधेनंतर मनपा प्रशासनाने ऑनलाइन कर स्वीकारण्याची तयारी केली आह़े त्यासाठी मालमत्ताधारकांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली असून केवळ मालमत्ता क्रमांक टाकून स्वत:च्या मालमत्ता कराची पावती मालमत्ताधारकाला ऑनलाइन शोधता येईल़ त्यानंतर लागलीच क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंटदेखील करता येणार आह़े सदर सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक होत़े त्यामुळे मालमत्ताधारकांकडूनदेखील तशी मागणी सातत्याने होत होती़ ऑनलाइन कर भरणे शक्य झाल्यास धुळ्यात मालमत्ता असलेल्या, मात्र सध्या बाहेरगावी राहत असलेल्या नागरिकांनादेखील मालमत्ता कराचा भरणा ऑनलाइन करता येणार आह़े त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाला आह़े त्यानुषंगाने सदरची सुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी सुरू असून लवकरच अंमलबजावणी होणार  आह़े