शिरपूर : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर २०२० ते २०२५ या कालावधीसाठी मुदत संपलेल्या अशा एकूण ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार आबा महाजन यांनी जाहीर केला़ मात्र, महिला आरक्षण १ फेब्रुवारी रोजी काढले जाणार आहे़ दरम्यान, आरक्षण सोडतीवेळी इच्छुकांची घालमेल पाहावयास मिळाली़ काहींची नाराजी झाली तर काहींनी अपेक्षित सरपंच आरक्षण पडल्याने जल्लोष केला़तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेत ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला़दरम्यान, तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली़ सुरुवातीला अनुसूचित जातीचे आरक्षण काढल्यानंतर अनुसूचित जमाती, ओबीसी व शेवटी सर्वसाधारण जागेचे आरक्षण काढण्यात आले़ नम्रता युवराज कोळी या बालिकेने आरक्षित जागेची सोडत काढली.आता १ फेब्रुवारी रोजी महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यात कोणाचे भाग्य खुलेल आणि कोणाला फटका बसेल, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.५० टक्के आरक्षण - अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती १५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३० असे ६८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे़उद्या महिला सरपंचपदाचे आरक्षण सोडत - तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे़त्यामध्ये अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती १५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३० असे ६८ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे़प्रत्येक विभागात ५० टक्के याप्रमाणे महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे़
आता लक्ष महिला सरपंच आरक्षणाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 14:41 IST