आॅनलाइन लोकमतशिंदखेडा (जि.धुळे) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाºयांसाठी आज तहसील कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात हे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया ७५ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांचे प्रशिक्षण २६ रोजी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत या वेळेत येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत बांदल, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुदाम महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.सदर प्रशिक्षणात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनवर दोन मतपत्रिका असतील. त्याप्रमाणे मतदारांना मतदान करण्याचे सांगायचे असून मतदारांना मतदार यादीतून नाव शोधण्यासाठी देखील सहकार्य करायचे आहे. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी, कॅमेरा वापरण्यास मनाई आहे. याबाबत सतर्कता पाळायची आहे. मतदाराकडून १७ पुराव्या पैकी कुठलाही एक पुरावा ग्राह्य धरायचा आहे. इव्हीएम मशीन याबाबत सविस्तर माहिती तहसीलदार साहेबराव सोनवणे तसेच सुदाम महाजन यांनी दिली.तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी १ हजार १५८ कर्मचाºयांना बोलविले होते. त्यापैकी ७५ कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर होते. गैरहजर असणा-या कर्मचा-यांना निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत बांदल यांनी नोटीसा बजावल्या आहे. गैरहजर राहण्या बाबतचा त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
शिंदखेडा येथील निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर ७५ कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 20:53 IST