शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान’ ठरतेय नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 19:45 IST

११ रूग्णालयांद्वारे सेवा । जिल्ह्यात दोन लाख नोंदणीकृत कुटुंबाना मिळाला लाभ

चंद्रकांत सोनार ।धुळे : जिल्ह्यातील दोन लाख कुटुंबांवर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आतापर्यंत ५ लाख खर्चापर्र्यंत मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्बलांसाठी ही योजना नवसंजीवनी देणारी ठरली आहे़आरोग्य क्षेत्रात रूग्णांना महागड्या उपचारासाठी स्वत:चे पैसे खर्च करावे लागतात़ गरीब रूग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणानुसार केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत व जन आरोग्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे़३० हजार कुटुंबांना ई-कार्डलाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष रुपये पाच लाख आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही रुग्णालयात रुपये पाच लाखांपर्यंत विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. जिल्हातील ११ रूग्णालयांचा या योजनेसाठी समाविष्ठ करण्यात आले असुन जिल्ह्यातील ३० हजार १८८ लाभार्थ्यांना या योजनेचे ई-कार्डचे वाटप करण्यात आले आहे़११ रूग्णालयांचा समावेशभाऊसाहेब हिरे वैद्यकीय विद्यालय, जवाहर मेडिकल कॉलेज, विर्घहर्ता रूग्णालय , इन्स्टिट्यूट आॅफ युरोलोजी साक्रीरोड, सेवा हॉस्पिटल, सिध्देश्वर, सुधा हॉस्पिटल, देवरे हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल समावेश आहे़९९५८ रूग्णांवर झाले उपचारआयुष्यमान भारत योजनेअंतर्गत १३ जुन २०१९ पर्यत जिल्ह्यातील ९ हजार ९५८ रूग्णांवर जनआरोग्य योजनेत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ शासनाचा एकूण २२.२७ कोटी एवढा खर्च झाला आहे़१३०० आजारांवर उपचारआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून रूग्णांवर १३०० आजारांवर उपचार केले जातात़ त्यासाठी प्रतिकुटूंब ५ लाखाच्या रकमेचे मोफत उपचार केला जातो़ तर केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड धारकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ९७१ आजारामध्ये १.५ लाख रूपयापर्यत मोफत उपचार केले जातात़ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे