शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या स्वास्थासाठी मानले जातात नवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 19:36 IST

जोगीदेव यात्रोत्सव : माळमाथ्यावर ४० हजार शेतकºयांनी गुरांसह यात्रेत लावली हजेरी

ठळक मुद्देयात्रेसाठी याठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी हॉटेल, नारळ विक्रीचे दुकाने, खाद्य पदार्थाचे स्टॉल, देवापुढे वाहण्यासाठी गुरांचे ठसे असलेले चांदीचे पदके विकणाºया दुकाने मोठ्याप्रमाणावर लागलेली होती. यात्रेत दिवसभरात सुमारे ३० ते ४० हजार भाविकांनी आपल्या गुरांसह दिवसभर या जंगलात शेतकºयांची गर्दी होती. यात्रेत हजारो रुपयांचे नारळ विकले गेले. सायंकाळी यात्रेचा समारोप झाला.डोंगराच्या माथ्यावर एका झाडाजवळ जोगी देवचे स्थान आहे. शेतकरी गुरांसह डोंगर चढून वर पोहचल्यावर या झाडाला प्रदक्षिणा करतात. तसेच सोबत आणलेला दही, दूध, तुप आणि शिºयाचा प्रसाद चढवितात. तसेच सोबत गुरांच्या पावलाच्या तयार चांदीच्या पादुका त्याठिकाणी अर्पण करतात

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात निजामपूरच्या पूर्वेकडे १८ कि.मी. अंतरावरील डोंगर रांगामधील एका डोंगराच्या माथ्यावर जोगीदेव देवस्थान आहे. याठिकाणी पोळ्याच्या दुसºयादिवशी परंपरेनुसार जोगीदेव यात्रा भरते. या यात्रेचे विशेष म्हणजे शेतकरी याठिकाणी गुरांच्या स्वास्थासाठी नवस मानतो आणि ते यात्रेत फेडतो. यात्रेत शेतकरी आपली गुरे घेऊन नवस फेडण्यासाठी तर काही नवस मानण्यासाठी येतात. यंदाही ३० ते ४० हजार शेतकºयांनी यात्रेत गुरांसह हजेरी लावली.साक्री तालुक्यात गुरांच्या आरोग्यासाठी सुमारे १०० ते १५० वर्षापासून शेतकरी जोगीदेवचा नवस मानतो. नवसाला देव पावला की पोळ्याच्या दुसºया दिवशी भरणाºया यात्रेत ज्या गुरांचा नवस फेडयाचा असतो. त्या गाई, बैल, घोडे, बकºया, मेंढयासह शेतकरी जोगीदेवचे डोंगर चढून जोतो. डोंगराच्या माथ्यावरील जोगीदेव स्थानास प्रदक्षिणा मारतात. आणि दही, दूध, तूप आणि शिºयाचा प्रसाद जोगीदेवला चढवतात. आणि तोच प्रसाद खातात.माळमाथ्यावर म्हसाळे गावापासून थोडे पुढे गेल्यावर आमोदे फाटयावरुन आमोदे व पुढे आगरपाडा रस्त्यात हिरव्याकंच डोंगर दºयामधून ओढे पार करुन जोगीदेव स्थानावर पायी पोहचतात. हा रस्ता कच्चा आहे. जोगीदेव स्थान हे डोंगरच्या कड्यावर आहे.पोळ्याच्या दुसºया दिवशी मंगळवारी भल्या पहाटे पासून धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातून शेतकरी बैलगाडी, घोडे, जीप, ट्रक व सायकलीवर तर काही पायी या स्थानावर पोहचत होते. सोबत आपल्या गाई, बकºया, बैल, घोडे व मेंढयासुद्धा होत्या.