शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा परिचारिकांनी काळ्या फिती लावून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:58 IST

जिल्हा परिषद : बदली प्रक्रियेंतर्गत समुपदेशनासाठी आल्या होत्या जिल्ह्यातील परिचारिका

धुळे : जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारी कृषी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यावेळी परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना सीईओंनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ परिचारिकांनी काळ्याफिती लावून निषेध केला. परिचारिकांनी लावलेल्या काळ्या फितींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.गेल्या शनिवारपासून जिल्हा परिषदेतील संवर्ग तीन व चारच्या कर्मचाºयांची बदली प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा होता.मंगळवारी कृषी, आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठी समुपदेशन करण्यात आले. बदलीपात्र कर्मचारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाल्याने, याठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती. यात काही परिचारिका लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या.दरम्यान निमगुळ येथे कार्यरत असलेल्या सहायक आरोग्य सेविका व परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनंदा निकम यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांनी काही दिवसांपूर्वी अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकाराचा निषेध म्हणून बदली प्रक्रियेसाठी आलेल्या जवळपास १०० परिचारिकांनी काळ्याफिती लावून अधिकाºयाच्या वर्तुवणुकीचा निषेध केला. घडलेल्या प्रकाराबद्दल सीईओंनी माफी मागावी अशी मागणी निकम यांनी यावेळी केली.

टॅग्स :Dhuleधुळे