मोहना सूर्यवंशी पुढे म्हणाल्या की, स्त्रीया आपले विशिष्ट ध्येय घेऊन कर्तव्य बजावत असतांना आपले मानवी हक्क, न्याय, स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, लिंगभेद निर्मूलन, मतदानाचा हक्क, प्रसूती रजा, नोकरीतील कामाचे तास कमी करणे व पगारवाढ अशा अनेक हक्क प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आंदोलने व संघर्ष केले आहेत. स्त्री सबलीकरणाच्या कामात स्त्रीमुक्ती संघटना, जागतिक स्तरावरील दूरदर्शी विचार असलेले स्त्री-पुरुष, समाज सुधारक, लेखक, कथा कादंबरीकार, वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके व प्रसार माध्यमे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. समृद्ध समाज निर्मितीसाठी स्त्री सबलीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रीयांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना स्वातंत्र्य तसेच सन्मान देणे गरजेचे आहे. समृद्ध व आत्मनिर्भर समाज निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यात स्त्रीशक्ती सोबत येण्यासाठी कुटुंबात तसेच समाजातील पुरुषांनी लिंगभेद न पाळता स्त्रीयांचा सन्मान व आदर राखत त्यांच्याशी सुसंवाद व समन्वय साधने आवश्यक आहे.
प्राचार्य डॉ.पवार म्हणाले की, ज्या कुटुंबात स्त्रियांना योग्य सन्मान व आदर केला जातो त्या घराला आदर्श घरपण लाभते. कुटुंबातील स्त्रीयांच्या प्रगतीसाठी पुरुष मंडळीने स्त्रीयांना समजून घेतले पाहिजे.
प्रास्ताविक प्रा. डॉ.वर्षा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले. प्रा.वंदना पाटील यांचे कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य लाभले उपप्राचार्य डॉ. विद्या पाटील, प्रा.व्ही.एस.पवार, डॉ.डी.के.पाटील, निखिल पाटील प्रा.डॉ.पी.एस. गिरासे आदी उपस्थित होते.