धुळे : भोई समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला जिल्हा भोई समाज महासंघातर्फे देण्यात आले़ एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे २१ एप्रिल रोजी गरीब कुटूंबातील नऊ वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाºया लोटन पाटील यांने अमानुष बलात्कार केला़ त्यामुळे संपुर्ण भोई समाजात संतापाची लाट उसळली आहे़ माणुसकीला काळीमा फासणाºया कृत्य करणाºया नराधमास तत्काळ फाशी द्यावी, तसेच सरकारी वकील अॅड़ उज्जल निकम यांची नियुक्ती करावी़ सदरील कुंटूंबास शासकीय मदत देऊन पोलीस संरक्षण द्यावे़ ़प्रशासनाने गार्भीयाने दखल न घेतल्यास भोई समाज रस्त्यावर उतरणार असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़ निवेदनावर वसंत तावडे, जी़टी़वाडेकर, पंडीत मोरे, संतोष खेळकर, फुलपगारे बी़एच़ नामदेव तावडे, एक़े़ भोई, गणेश मोरे, राहुल फुलपगारे, प्रदिप फुलपगारे, अशोक तमखाने, सुभाष फुलपगारे, तुळशीदास भोई, श्रीकांत फुलपगारे, प्रभाकर भाई, नरेंद्र फुलपगारे, प्रमोद भोई आदींच्या निवेदनावर स्वाक्षया आहेत़
बलात्कार करणाºया नराधमास फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:16 IST