शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण आपल्या दारी उपक्रमातून शेतकर्यांच्या अडचणी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:49 IST

शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत कार्यवाही करण्याच्यास सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.

धुळे : कृषी पंपासाठी वापरले जाणारे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरित देऊन रब्बी हंगामात शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा द्यावा, मागणीनुसार तातडीने सिंगल फेज कनेक्शन सुरू करावे तर महावितरण आपल्या दारी अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत कार्यवाही करण्याच्यास सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.धुळे तालुक्यातील शेतीपंप व गावातील विजेच्या प्रश्‍नांसंदर्भात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला कार्यकारी अभियंता डी. डी. भामरे, के.एस. बेले, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.माजी सभापती बाजीराव पाटील, उपकार्यकारी अभियंता एन.बी.गांगुर्डे, योगेश चव्हाण, हेमंत अहिरे, अशोक सुडके, योगेश पाटील, आबा शिंदे, सुभाष पाटील, दशरथ पाटील, भूषण बोरसे, विवेक जाधव आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सुरळीत व अखंडत वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणकडून अडचणी सोडवाव्यात तसेच महावितरण आपल्या दारी योजना सुरू करून वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या अशा शेतकऱ्यांना वीज जोडणी करून द्यावी. तालुक्यात शेतशिवारात राहणाऱ्या अनेक ग्राहकांनी सिंगल फेज वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. तसेच कृषीपंपाचा जळालेला ट्रान्सफॉर्मर उशिरा बसविण्यात येत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. कटआऊटसाठी आमदार निधीधुळे तालुक्यात ४८०० ट्रान्सफॉर्मरची संख्या आहे. या ट्रान्सफॉर्मरवर असलेले फ्यूज (कटआऊट) फुटलेले असून आणि धोकेदायक अवस्थेत आहेत. या सर्व ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूज बदलून नवीन टाकण्यासाठी आवश्यक तो आमदार निधी देण्याचे आ. कुणाल पाटील यांनी यावेळी जाहीर केले. याबाबतचा त्वरित सर्व्हे करण्याच्याही सूचना आ.पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच काही गावातील जीर्ण विद्युत तारा बदलण्याचे आदेश यावेळी दिले.
टॅग्स :Dhuleधुळे