कमकुवत विजेचे खांब ठरतात धोकेदायक
धुळे : शहरातील काही भागांमध्ये विद्युत खांब अतिशय जीर्ण झाले आहेत. हे विजेचे खांब पडून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खराब झालेले विजेचे खांब बदलण्याची मागणी होत आहे. विजेचे खांब बदलण्यासाठी वीज कंपनीने आर्थिक तरतूद करावी. विद्युतखांबदेखील धोकेदायक ठरू लागल्या आहेत. धुळ्यात नुकतेच एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे विद्युत खांब आणि वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
प्लॅस्टिक कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष
धुळे : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शासनाने प्लॅस्टिकबंदी जाहीर केली आहे. या नियमाच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपविली आहे. त्यानुसार पालिकेने पथके नियुक्त केली होती. सुरुवातीच्या काळात कठाेर कारवाई करीत प्लॅस्टिकबंदी झाली होती. परंतु आता या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे.
महामार्गावर चिखल चालक हैराण
धुळे : सुरत-नागपूर महामार्गावर धुळे शहरापासून ते अक्कलपाडा प्रकल्पापर्यंत ठिकठिकाणी खड्डे आणि त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दुचाकीस्वारांचे सर्वाधिक हाल आहेत.