धुळे शहरात मृत्यू झालेल्या बाधित रूग्णामध्ये सर्वाधित मृत्यू मध्यमवर्गीय रूग्णांचे झालेले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग दुसऱ्या लाटेत झपाट्याने होत आहे. फेब्रुवारी ते मार्चअखेर कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसाला पाचशेपार केली आहे. कोरोना बाधित रूग्णामध्ये सर्वाधित रूग्ण शहरातील असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यत जिल्ह्यात ०० बाधित रूग्ण आढळून आलेले आहे. त्यापैकी ००० रूग्णांवर सध्या सरकारी व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर ००० रूग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. सध्या ००० रूग्णांवर उपचार केले जात आहे.
मृत्यू व वयोगटातील रूग्ण
जिल्हात पहिला कोरोना बाधित रूग्ण एप्रिल २०२० मध्ये साक्री तालुक्यात आढळून आला होतो. त्यानंतर शहरातील एका कोरोना बाधितांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तेव्हापासून ते आतापर्यत शहरात १८३ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात शुन्य ते १० वयोगटातील एकाही बालकांचा अद्याप मृत्यू झालेला नाही. तर ११ ते २० वयोगटातील ३ तरूणांचा मृत्यू झालेला आहे.
२१ ते ३० वयोगटातील चार रग्ण, ३१ ते ४० वयोगटातील १९, ४१ ते ५० वयोगटातील ३०,५१ ते ६० वयातील ४५, ६१ ते ७० वयातील ४५ तसेच ७१ ते ८० वयोगटातील २५ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहेत. तर ८० वयोगटातील पुढील एकाही बाधित रूग्णांची मृत्यूची नोंद अद्याप झालेली नाही.
बालक सेफ तर
तरूण हायरिक्समध्ये
आतापर्यत बाधित रूग्णांच्या मृत्यू आलेखावरून ० ते १० वयोगटातील एकाही बालकांचा मृत्यू झालेला नाही. तर ५१ ते ६० वयोगटातील तब्बल ५७ कोरोना बाधित रूग्णांचा शहरात मृत्यू झालेला आहे.
डिसेबरपासून बाधित रूग्णांची मृत्यूची संख्या वाढली
७ जुलै २०२० पर्यत शहरात ३० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होतो. तर ६१५ बाधित रूग्ण आढळून आलेल होते. त्यामुळे शहराचा मृत्यू दर ४.८७ टक्के होता. ऑक्टोबर २०२० पर्यत नियमित बाधितांची तपासणी प्रशासनाकडून केली जात असल्याने बाधित व मृत्यू कमी जास्त होती. त्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यापासून बाधितांची तपासणी वाढविण्यात आल्याने बाधितांसोबतच मृत्यूची संख्येत देखील वाढ झाली आहे. ८ ते १४ डिसेबर सात दिवसात चार बाधित रूग्णांचा शहरात मृत्यू झाला. त्यामुळे ४.८७ टक्के मृत्यूदर ६.६६ टक्यापर्यत पोहचला, १५ ते २५ जानेवारी २०२१ पर्यत चार बाधितांचा मृत्यू झाला. त्यानंतर २६ ते आतापर्यत ९ जणांना मृत्यू झाल्याने कोरोना बाधितांची मृत्यू संख्या शहराची १८३ तर सध्याचा मृत्यूदर शहराचा १.५९ टक्यावर पोहचला आहे.
शहरातील १ हजार ७८८ बाधितांवर सध्या उपचार
शहरात आतापर्यत ११ हजार ४४५ कोराेना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ हजार ६१४ बाधित रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहेत. तर सध्या १ हजार ७८८ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान मंगळवारी पहिल्यांदा कोरोना बाधितांची संख्या ५५० पार केली होती.