शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुकटीच्या बॅँकेत पैसे मिळेना़़़!

By admin | Updated: January 20, 2017 23:58 IST

मुकटी येथे सेंट्रल बॅँकेच्या शाखेत पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत असून बॅँकेपुढे गर्दी असल्याचे चित्र कायम आहे.

धुळे : तालुक्यातील मुकटी येथे सेंट्रल बॅँकेच्या शाखेत पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत असून बॅँकेपुढे   गर्दी असल्याचे चित्र कायम आहे. शुक्रवारी शेतक:यांनी शाखाधिका:यांची भेट घेऊन कैफियतही मांडली. मुकटी येथील सेंट्रल बॅँक शाखेला परिसरातील 13 गावे जोडलेली असून सुमारे 35 हजार खातेदार आहेत. पैसे मिळत नसल्याने शेतकरी व मजुरांचे हाल होत आहे. या संदर्भात बॅँकेच्या वरिष्ठांशी बोलून मार्ग काढा, अशी मागणी शेतक:यांनी बॅँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील डुंगडुंग यांच्याकडे केली. युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंखे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी ही भेट झाली. बॅँक कर्मचा:यांकडून परिचितांना अन्य ग्राहकांपेक्षा जास्त पैसे दिले जातात. काहींना चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळालेले नाही. शेतकरी, मजुरांचे जास्त हाल आहेत. निराधार योजनेचे वृद्ध लाभार्थी, पेन्शन व पगारधारकांनाही पुरेसे पैसे मिळत नाही, असा पाढा यावेळी वाचण्यात आला. यावर शाखा व्यवस्थापक डुंगडुंग म्हणाले की, तसे काही नाही. बॅँकेला एक दिवसाआड 10-15 लाख मिळतात. सर्वाना काही ना काही गरज असल्याने रांगेतील सर्वाना पैसे मिळावेत, असा आमचा प्रय} असतो. लवकरात लवकर पुरेसे पैसे कसे उपलब्ध होतील हे पाहू, असे आश्वासन शेतक:यांना देण्यात आले.  बॅँकेला शुक्रवारी नेहमीपेक्षा जास्त म्हणजे 25 लाख रुपये मिळाले असून प्रत्येक ग्राहकाला पैसे वाटप करण्याचा प्रय} केला जाईल, असे व्यवस्थापक डुंगडुंग यांनी संध्याकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा सांगितले. मर्यादेएवढे कमाल पैसे दिल्यास पहिल्या 20-22 ग्राहकांनाच पैसे पुरतील. त्यामुळे उपलब्ध पैसे रांगेत उभ्या सर्वाना मिळावे, या दृष्टीने वाटप केले जाते. मुकटी येथे सतत पैसे वाटप होऊनही गर्दी कायम असते. ग्राहक रांगेत उभे राहण्यासही प्रसंगी तयार नसतात. त्यामुळे कर्मचारी हतबल ठरतात.   - प्रदीप गिलाणकर, अग्रणी बॅँक व्यवस्थापक पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल पिंपळनेर : नोटाबंदीचा काळ उलटून गेल्यानंतरही शेतक:यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे माळमाथा परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. नोटाबंदीच्या काळात मोठय़ा कष्टाने जमवलेले पैसे बॅँकेत ठेवले. परंतु, शेतक:यांना त्यांचे पैसे मिळत नसल्यामुळे रब्बीचे कामे खोळंबली आह़े रब्बी हंगामांतर्गत ऐन मशागतीच्या काळात कापूस, मका, ज्वारी विकून हाती पैसे देण्याऐवजी व्यापा:यांनी शेतक:यांना चेक दिला.  परंतु, शेतक:यांनी चेक जमा करूनही पैसे काढण्यासाठी शेतक:यांना रांगेत उभे राहून पैशाची प्रतीक्षा आहे. परंतु, ‘कॅश शिल्लक’ नसल्यामुळे शेतक:यांची अडचण झाली आहे.