शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा मुख्य रस्त्यावर ठिय्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:21 IST

महापालिका : पशुपालकांवर कारवाई करण्याची गरज ; रस्त्यावरील अपघाताच्या प्रमाणात वाढ

धुळे : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे़ त्यामुळे वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. रस्त्यांवर गुरे सोडून वाहतूक अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द कारवाई करण्याची गरज असतांना देखील महापालिका प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे़याठिकाणी असतो गुरांचा ठिय्यापाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात गुरे बिनदिक्कतपणे फिरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते. त्यात गायींचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर फिरतात. चौकात भाजीपाला विक्रेते असल्याने भाजी विक्रेते उरलेला भाजीपाला तेथे फेकत असल्याने येथे जनावरांची गर्दी होते. दत्तमंदिर चौक ते थेट बारापत्थर, शिवाजी महाराज चौकापर्यंत या मोकाट गुरांचा मुक्त संचार आढळून येतो.मनपाकडे कोंडवाडाच नाहीमोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात येते़ त्यानतंर गुरांच्या मालकावर कारवाई केली जाते़ मनपाकडे कोंडवाडा नसल्याने कारवाई भुमिका घेतली जात नाही़ त्यामुळे एका वर्षापासुन आरोग्य विभागाकडून कोणतेही कारवाई केलेली दिसुन येत नाही़वाहतुक कोंडीचा मनस्तापमुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोकाट ेजनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण मोठे असल्याने मुख्य चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार होतात. त्यातच ही जनावरे रस्त्यावर चालतात बºयाचदा रस्त्याच्या कडेला, चौकात बसून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.मनपाचे पथक नावालाचमोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक नियुक्त केले जाते़ या पथकात मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो़ पथका कोणतीही कारवाई केली जात नाही़ केवळ रस्त्यावर बसलेल्या गुरांना उठवले जाते़चारा विक्रेत्यांच्या त्रासपाचकंदील चौक, पाटबाजार, दत्तमंदिर, पारोळा रोड, साक्रीरोड भागात आणि इतरही भागात जनावरे फिरताना दिसते. गेल्यावर्षी गुरांच्या मालकांना दंडही ठोठावण्यात आला. सकाळी मोकाट जनावरे चारा विक्रेत्यामागे फिरतात असतात त्यामुळे वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो़

टॅग्स :Dhuleधुळे