शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी की नोट आणि सैराटसह ‘दंगल’

By admin | Updated: January 5, 2017 23:01 IST

नायलॉन आणि चायना दो:याचीही सर्रास विक्री : पतंगोत्सवाची आतापासूनच सुरू झाली धूम

नंदुरबार : मकरसंक्रांतीनिमित्त साज:या होणा:या पतंगोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहराच्या आकाशात सकाळी व सायंकाळी शेकडो रंगीबेरंगी पतंग उडताना दिसत आहेत. पतंग उडविण्यासाठी लागणारा दोरा अर्थात मांजा नायलॉनपासून तयार करण्यास बंदी घालण्यात आलेली असतानाही त्याची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यंदा पतंगांमध्ये ‘मोदी की नोट’ची जादू असून ‘सैराट’ व ‘दंगल’ धूम करीत आहेत.मकरसंक्रांतीला नंदुरबारात मोठय़ा प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठीची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. यंदादेखील गेल्या 15 दिवसांपासून पतंग उडविण्यास सुरुवात झाली आहे. यंदा विविध आकार व प्रकारातील पतंग बाजारात दाखल झालेले आहेत. दोरा अर्थात मांज्याचेदेखील विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत.चौकाचौकात दुकाने सजलीशहरातील चौकाचौकात पतंग व मांजा विक्रीची दुकाने सजली आहेत. अगदी दोन रुपयांपासून दीडशे रुपयांर्पयतचे आकर्षक पतंग उपलब्ध झाले आहेत. येत्या आठ दिवसात पतंग विक्रीच्या दुकानांमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यातून लाखोंची उलाढाल शक्य आहे. यंदा शनिवार व रविवार असे दोन दिवस पतंगोत्सवासाठी मिळणार असल्यामुळे तरुणाईमध्ये उत्साह आहे. दरवर्षी पतंग-दोरा व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी साधारणत: 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबारला मंगळबाजारासह अमर, अमृत सिनेमागृह परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, स्टेशन रोड, गणपती मंदिर या भागात पतंगांची दुकाने थाटली जातात. यावर्षी चायना मेडपासून निर्मित पतंग, दोरा, चक्रीला विशेष मागणी     आहे.  काच, सरस, रंग आणि इतर साहित्याद्वारे रिल बनविला जातो. यंदा 24 कॅरेट, आरडीएक्स, बाजीगर, गेंडा, बियर, चॅलेंज, अगAी, ग्रिफीन, एसपीथर्ड, मोनोकाईड, एस. पॉवर, आयबीके गोल्ड प्रकारातील दोरा बाजारात उपलब्ध आहे. 80 ते 500 रुपयांर्पयत आणि 500 ते एक हजारावर या प्रमाणात दोरा मिळतो. याशिवाय चक्रीमध्ये स्टील, प्लॅस्टिक, लाकडी प्रकार आहेत. तसेच लहान मुलांचे आकर्षक ठरलेले चार बाय चार इंचाचे छोटा भीमचे पतंग अवघ्या दोन रुपयात मिळत आहेत. यामुळे बच्चे कंपनी जाम खूष आहे. पतंग उडवताना दुखापत झाल्यास हाताला, बोटाला, चिटकविण्याची पट्टी, रबरी सुरक्षा कव्हर, ग्लोव्हज्, हातमोजे विविध प्रकारात बाजारात विक्रीस आले आहेत. याशिवाय नवीन वर्ष 2017 च्या स्वागताचे विविध रंगीबेरंगी पतंग बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.