धुळे : तीन कृषी कायद्यांना विरोध करीत दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे़ या आंदोलनाला पाठींबा दर्शवत आमदार डॉ़ फारुख शाह यांनी चाळीसगाव रोड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केले़ यावेळी दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली होती़केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातील शेतकरी बांधव तसेच विविध शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीसह ईतर ठिकाणी तळ ठोकून आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकºयांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. या बंदला देशभराच्या काना कोपºयातून पाठिंबा देण्यात आला होता. महाराष्ट्रातही राजकीय पक्षांसह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तिन्ही वादग्रस्त व अन्यायकारक असलेले कृषी कायदे मागे घ्या, हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा, किमान हमी भावाचा कायदा करा, तीन टक्के ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा आणि सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा तसेच कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा अश्या मागण्या घेत धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेत सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन केले़
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आमदारांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 22:23 IST