शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाण्याची होते रोज नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:10 IST

महापालिका : लोकमतच्या आवाहनानंतर धुळेकरांनी कळविल्या पाणी गळतीच्या समस्या

धुळे : शहरात दररोज व्हॉल्व व जल वाहिनीच्या गळतीव्दारे लाखो लीटर पाण्याची अक्षरश: नासाडी होते़ शहरातील गळती रोखण्यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानंतर दररोज शहरातील विविध परिसरातील नागरिक व्हॉटसअपवर आपल्या भागातील गळतीचे फोटो पाठवित आहे.धुळेकरांना तापी पाणी पुरवठा योजनेसह नकाणे आणि डेडरगाव तलावातून पाणी वितरीत केले जाते़ आजच्या स्थितीत बहुसंख्य भागात ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ त्याचे नियोजन पुरेशा प्रमाणात होत नसताना पाण्याची पाईप लाईन अथवा व्हॉल्व गळतीतून पाणी वाया जाते़ पाणी प्रश्नावर दरवर्षी मनपा गळती दुरूस्तीसाठी लाखो रुपये खर्च करीत असते. मात्र तरी देखील गळती रोखण्यास प्रशासनाला यश आले नाही़शहरातील व्हॉल्वव्दारे होणारी गळती थांबविण्यासाठी प्रत्येक प्रभागानुसार सर्वेक्षण करून दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहेत तरच भविष्यातील पाणी प्रश्नावर मनपाला मात करता येवू शकते़लाखो लीटरची नासाडीशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याने जलवाहिनी फुटण्याचा प्रकार सतत घडतात़ प्रशासनाकडून दुरूस्ती केली जाते़ मात्र ती केवळ मोठ्या गळतीवर त्यामुळे आजही शहरातील बहुसंख्य व्हॉल्व, हातपंप, जलवाहिनीतून दुरूस्तीअभावी दररोज लाखो लीटर पाणी गटारीत वाहून जाते़गळतीमुळे दुषित पाणी पुरवठाभीमनगर, मच्छीबाजार, मोगलाई, आग्ररोड, देवपूर, वलवाडी, आदर्श कॉलनी अशा विविध भागात व्हॉल्व व जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत असते़ गळतीमुळे तयार होणाºया पाण्याच्या डबक्यातील दुषित पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहचत असते.अभियानातून दुरूस्तीनागरिकांच्या मुलभूत प्रश्न सुटावे, यासाठी शहरात राबविण्यात येत असलेल्या अभियानातून जलवाहिनी, व्हॉल्व गळती दुरूस्ती केली जात आहे़ तरीसुद्धा ज्याठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. त्याच प्रभागातील नागरिकांनी व्हॉटसअपद्वारे गळतीचे फोटो पाठविले आहे. म्हणून हे अभियान राबवितांना कुठेतरी दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गळती दुरुस्ती करुन दररोज होणारी पाण्याची नासाडी त्वरित थााबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे