शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कोटय़वधीची यंत्रसामग्री धूळखात

By admin | Updated: January 8, 2017 00:27 IST

दहीवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे.

दहीवद : पाच वर्षापासून शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे. विविध समस्यांच्या आर्थिक पेचात सापडलेल्या शिसाकाला नवनियुक्त संचालक मंडळाने तातडीने पावले उचलून भाडे तत्त्वावर इतरांना चालविण्यासाठी द्यावा किंवा आर्थिक संकटांवर मात करून स्वत: कारखाना सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा कारखानारूपी माळरान उजाड होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दहा वर्षापूर्वी सुजलाम सुफलाम अवस्थेत असलेल्या शिसाकाला सत्तापालट झाल्यानंतर घरघर लागली. 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत कारखान्याची सूत्रे 1983 ते 1990 दरम्यान कारखान्यातच लिपिक पदावर असलेल्या व्ही.यू. पाटलांकडे गेली. त्यांच्या कारकिर्दीत फक्त दोन हंगाम कारखाना कसाबसा चालला. त्या दरम्यान कारखाना तोटय़ात गेला. परिणामी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला. त्यानंतर 2011 पासून कारखाना बंद आहे. कारखाना प्रशासन कर्जाचे हप्ते चुकवू शकत नसल्याने अवघ्या 14 कोटी रुपयांचे कर्ज व्याजासकट 25 कोटींवर पोहचल्याने धुळे जिल्हा बँकेच्या तत्कालीन प्रशासकांनी कारखाना ताब्यात घेतला.छताला पडले खिंडारमहामार्गालगत सुमारे वीस हजार चौरस मीटर क्षेत्रात असलेल्या कारखान्याच्या मुख्य इमारतीचे छत सिमेंट पत्र्यांनी बंदिस्त आहे. गेल्या सात वर्षापासून कारखाना बंद असल्याने छताची डागडुजी अथवा दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे  ऊन, वारा, पावसाच्या आघाताने कारखान्याच्या छताला अनेक ठिकाणी पत्रा तुटून खिंडार पडले आहे. त्यामुळे त्याद्वारे पावसाळ्याचे पाणी कारखान्याच्या यंत्रसामग्रीवर पडते. यामुळे कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री गंजून गेली आहे. मात्र त्याचे कुणालाच सोयरसुतक दिसत नाही.कोटय़वधीची वाहने मातीमोलकारखाना बंद झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळच एक जेसीबी मशीन, तीन ट्रक, पाच ट्रॅक्टर, दोन मिनीडोअर, पाचशेवर लोखंडी बैलगाडय़ा अशी चांगल्या अवस्थेतील कोटय़वधी रुपये किमतीची वाहने गंजून गेली आहेत. ती निकामी झाल्याने भंगाराच्या भावात जातील, अशी त्यांची अवस्था आहे.सुरक्षा रामभरोसेकारखाना अद्यापही जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. कोटय़वधी रुपयांची मालमत्ता सांभाळण्यासाठी प्रत्येकी सहा याप्रमाणे दोन टप्प्यांत एकूण बारा खासगी सुरक्षारक्षक कारखाना इमारतीची सुरक्षा पाहत आहेत. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून कारखान्याच्या मालमत्ता चोरीच्या लहान मोठय़ा घटना वाढल्या आहेत.नवनियुक्त संचालकांसह सभासद शेतक:यांनी कारखाना बचावासाठी पुढे येणे गरजेचे आहे.