शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा चर्चेविनाच गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:32 IST

आदल्यादिवशीच सर्वसाधारण सभेत विविध विषय मंजूर झाल्याने घेतला निर्णय

ठळक मुद्देस्थायी समितीच्या आदल्या दिवशी झाली होती सर्वसाधारण सभास्थायीच्या अजेंड्यावर किरकोळ विषय होतेअवघ्या दोन-तीन मिनीटात सभा गुंडाळली

आॅनलाइन लोकमतधुळे : आदल्या दिवशीच सर्वसाधारण सभा झाली असल्याचे कारण सांगत कुठल्याही विषयावर चर्चा न करता अवघ्या दोन-तीन मिनीटात जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गुंडाळण्यात आली.जलसंधारण समितीची सभा आटोपताच दुपारी २.१० मिनीटांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समितीची सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते होेते. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती लिलावती बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे होते. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी.यांना काम असल्यामुळे ते अनुपस्थित होते. तर दोन समिती सभापतीही अनुपस्थित होते.स्थायी समितीसाठी विषय पत्रिकेवरही सदस्यांचे रजेचे असल्यास रजा मंजुरीबाबत विचार करणे, विषय समित्यांनी मागील सभेत केलेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करणे, सभेचे इतिवृत्त व ठराव वाचून कायम करणे असे चारच विषय होते.जे.एन. आभाळे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सभा सुरू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष दहिते यांनी माईक घेत, मंगळवारीच जिल्हा परिषदेची सभा झालेली असून, त्यात सर्व विषयांवर चर्चा होऊन ते विषय मंजूर केल्याचे सांगत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुठल्याही विषयावर चर्चा न होता अवघ्या दोन-तीन मिनीटात ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे काही अधिकारी आल्या पावली माघारी कार्यालयात गेले. 

टॅग्स :Dhuleधुळे