शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अर्थे, उंटावद यात्रेत लाखोंची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:08 IST

चैत्र यात्रोत्सव : भाविकांची रिघ, विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली

शिरपूर : तालुक्यातील अर्थे बु. येथे म्हाळसादेवी तर उंटावद येथे सुलाई माता यात्रोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला. येथे दिवसभर दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. या यात्रेत लाखोंची उलाढाल झाली.अर्थे- येथील म्हाळसादेवीच्या यात्रोत्सवाला चैत्र शुद्ध चर्तुदशीला सुरुवात झाली. येथे नवस फेडण्यासाठी व लहान बालकांचे जाऊळ काढण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. खानदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येथे येतात. या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाने मंदीर परिसरात भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देणगीतून उपलब्ध करुन दिल्या आहेत. यात्रोत्सवाच्या पाशर््वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात आली आहे. यात्रा परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्रेते, रसवंती, पूजेचे साहित्य, खेळणी, मनोरंजनासाठी पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे या व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळाला.उंटावद- अरुणावती नदीच्या काठी असलेल्या उंटावद येथील उत्तर महाराष्टÑातील एकमेव असलेल्या सुलाई माता मंदिरात यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. भाविकांनी दर्शनासाठी, मानमानता फेडण्यासाठी व लहान बालकांचे जाऊळ काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पुजेचे साहित्य, संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनासाठी पाळणे, विविध ज्वेलरी, कटलरी यासह खाद्यपदार्थ, रसवंती, शीतपेय व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. १८ रोजी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन दिवस ही यात्रा चालते. येथे भाविकांची राहण्याची, पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. शिरपूर- वरवाडे भागातील म्हाळसादेवी मंदिरातही चैत्रोत्सव साजरा केला जात आहे. महाआरती, पूजा पठण आदी कार्यक्रम झाले. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे