शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात सर्वसमावेशक महामूकमोर्चाला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:51 IST

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण : दोषींवर त्वरित कठोर कारवाईची मागणी 

ठळक मुद्दे- भव्य महामूक मोर्चाव्दारे अत्याचाराच्या घटनेचा निषेध- अत्याचार करणाºया नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी- शिस्तबध्द मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचा येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिरातील पाचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सर्व समावेशक महामूकमोर्चाला शहरातील मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. आग्रारोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ मोर्चात हजारो हजार पुरूष, महिला सहभागी झाल्या़मनोहर टॉकीजजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले़ त्यानंतर जिजाऊ वंदना झाली़ यावेळी पाच मुलींनी उपस्थित मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले़ त्यानंतर मोर्चा आग्रारोड, कराचीवाला खुंट, महापालिका कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बॅँक या मार्गे  जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला़ अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ मोर्चात भव्य काळा झेंडा घेऊन स्वयंसेवकांनी अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविला़  ११ विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले़ मोर्चाच्या समारोपापूर्वी सहा विद्यार्थिनींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ महामोर्चानंतर लागलीच स्वयंसेवकांनी रस्त्यांची स्वच्छता केली़ काही सेवाभावी संस्थांकडून मोर्चेकºयांसाठी पिण्याचे पाणी, नास्त्याची सोय करण्यात आली होती़ डोक्यावर एकसारख्या टोप्या परिधान करून मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला़ राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला़ मोर्चात राजकीय पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले़ त्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, हिलाल माळी, मनोज मोरे, अनुप अग्रवाल, सतिश महाले, महेश मिस्तरी, तेजस गोटे, सुनिल नेरकर, युवराज करनकाळ, शिवाजी दहिते, हिरामण गवळी, एम़जी़धिवरे यांचा समावेश होता़