शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यास लुटणारे दरोडेखोर मुद्देमालासह शिताफीने जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:59 IST

पाचपैकी तिघे अल्पवयीन : पोलिसांना यश; मधुबन कॉलनीतील घटना

धुळे : डोळ्यात मिरचीची पूड फे कून व्यापाºयाला लुटणाºया दरोडेखोरांच्या टोळीला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या विशेष पथकाने शिताफिने जेरबंद केले़ पाच दरोडेखोरांपैकी तीन अल्पवयीन आहेत़ त्यांच्याकडून चोरीची दुचाकी, मोबाईल आणि रोख असा एकूण ३ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़जेरबंद केलेल्या दरोडेखोरांची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉलमध्ये शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह विशेष पथकातील कर्मचारी उपस्थित होते़मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरातील मधुबन कॉलनीत शैलेश दामाभाई चौधरी आणि अन्य एकाला त्यांच्या पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले़ त्यांच्या डोळ्यावर मिरचीची पूड फेकली़ त्यांच्याजवळ असलेली एमएच १८ एएच ७९३२ क्रमांकाची दुचाकी लांबविली़ या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे १० ते १२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले़ घटना घडल्यानंतर आरडाओरड सुरु झाली आणि क्षणार्धात याच भागातून त्यांची दुचाकी घेऊन या तिघा भामट्यांनी पळ काढला़ ही घटना १ जून २०१९ रोजी सायंकाळी उशिरा घडली़ यानंतर चौधरी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ फिर्याद दाखल झाल्यानंतर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली़ या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले़ लूट प्रकरणात कोण सहभागी असू शकेल असे अंदाज घेण्यात आल्यानंतर संशयित ताब्यात आले़ त्यांना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले़ त्यांच्याकडून गुन्ह्याची कबूली मिळाली़ पोलिसांनी मयूर उर्फ बबवा सुरेश कंडारे, अनिल बाळकिशन रेड्डी या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले़ त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि रोकड हस्तगत करण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे