शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांच्या मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 22:23 IST

कोरोनामुळे वाढल्या अडचणी : संघटनांसह व्यक्तीगत अन्नांचे होतेय वाटप

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गरीब व गरजू नागरीकांचे हाल होत आहेत़ त्यांच्यासाठी सामाजिक संघटना आणि व्यक्तीगत स्वरुपात अनेक जण सरसावले आहेत़ त्यांच्या माध्यमातून अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे़प्राथमिक शिक्षक संघटनाधुळे तालुक्यातील कुसूंबा येथे भवानी भिलाटी येथील नागरिकांना धुळे तालुका शिक्षक समितीच्यावतीने जीवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले. ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात आला़ भवानी भिलाटी येथील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू त्यात तांदूळ, बाजरी, साखर, गुळ, तेल, दाळ, साबण अशा विविध वस्तुचे एक किट तयार करुन जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क घालून वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे बापू पारधी, एकनाथ भामरे, आनंद पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, महेंद्र पाटील, न्हानू माळी, विशाल परदेशी, जगदिश परदेशी, प्रविण गवळे, जिल्हा परिषद कुसुंबा भिलाटी शाळेचे मुख्याध्यापक जगदिश बडगुजर, मिना राजपुत, प्रभाकर रायते, सुजाता बागुल व गावकरी उपस्थित होते.कपील सोनार यांचा पुढाकारकोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखत असतानाच अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी कपिल सोनार सरसावले आहेत़ गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरु आहे़ सोडा गाडीवाले, चहा टपरीवाले, बर्फाचा गोळावाले, रिक्षाचालक तसेच धुणी भांडी करणाऱ्या महिलांना आतापर्यंत दिडशे कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आलेला आहे. तसेच पाचशे पेक्षा अधिक व्यक्तींना मास्क वाटप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या या उपक्रमाला त्यांचे वडील प्रमोद सोनार यांची मोलाची साथ लाभत आहे. तसेच आई मिनाक्षी सोनार व पत्नी कविता सोनार यांचे स्वयंपाक घरात विशेष सहकार्य लाभत आहे.अनिल दिक्षीत यांची मदतभाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दिक्षीत यांनी कामगार आघाडीच्या माध्यमातून २३ मार्च पासुन रोज ५ या प्रमाणे कामगार, पुरोहित इ. सुमारे १२५ पेक्षा जास्त गरजंूना मदतीच्या किट चे वाटप केले आहे़ ज्यात ५ किलो तांदूळ, ३ किलो गहू, १ किलो शेंगदाणे, १ किलो तेल, तिखट व हळद, १ किलो तूरडाळ, १ किलो चहा पावडर, खोबरेल तेल बाटली इ. चा समावेश आहे़ याशिवाय पायी जाणाºया (पायी प्रवास करणाºया) गरीब लोकांना स्व खर्चाने खिचडी चे वाटप केले जात आहे़ गेल्या महिन्याभरापासून उद्योग बंद असल्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे