शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

‘मजीप्रा’ कर्मचाºयांचा बेमुदत संप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:27 IST

धुळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाºयांचे वेतन व निवृत्तीवेतनाचे दायित्व राज्य शासनाने स्वीकारावे

धुळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाºयांचे वेतन व निवृत्तीवेतनाचे दायित्व राज्य शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीतर्फे ५ मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ त्याबाबतचे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले़राज्यातील नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा आणि मलनि:सारण कार्यक्रम जलदगतीने विकास व नियमन करण्याच्या अनुषंगाने अधिनियम १९७६ अन्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना झाली आहे़ मजीप्राचा खर्च आतापर्यंत मिळणाºया १७़५ टक्के ईटीपीमधून भागविण्यात येत होता मात्र ७२ व ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार पाणीपुरवठा व्यवस्थापन, नियोजन व कार्यान्वन स्थानिक संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आल्याने मजीप्राचे उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत कमी झाले आहे़ मजीप्राच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी टिपणी तयार करण्याचे आदेश दिले होते, मात्र आतापर्यंत त्याबाबत निर्णय झालेला नाही़ त्यामुळे मजीप्रा कर्मचारी १ ते ४ मार्च काळ्या फिती लावून काम करणार असून ५ मार्चपासून मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी संपावर जातील़ मुंबईचे आझाद मैदान व प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असून तसे निवेदनाव्दारे स्पष्ट करण्यात आले़ या वेळी एस़पी़ पडियार, व्हीक़े़सूर्यवंशी, एस़व्ही़वाणी, यू.आऱ भोई, एस़एस़धोत्रे, एच़जे़ शेख उपस्थित होते़