शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

मालपूर परिसरात पशुधन रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:41 IST

दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी व परिचर ही दोन्ही पदे रिक्त

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सुमारे दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी व परिचर ही दोन्ही पदे रिक्त आहेत. यामुळे येथील पशुपालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. योग्य उपचाराअभावी किंमती पशुधन मुत्युमुखी पडत आहे. यामुळे शेतकरी, पशुपालक हवालदिल झाले आहेत.मालपूर हे धुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त दुध उत्पादन करणारे गाव आहे. येथे विविध वंशाच्या गायी असून पशुची संख्या देखील मोठ्या आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे दूषित पाणी किंवा रानातील अपरिपक्व हिरवा चारा खाल्ल्यामुळे गुरांना विषबाधा होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यक उपलब्ध नसल्यामुळे वेळेत औषधोपचार होऊ शकत नाही. यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय आहे. येथील दवाखान्यातील वर्णोपचार पी.व्ही. चव्हाण हे आजारी गुरांवर उपचार करतात. प्रसंगी गंभीर गुरांवर भ्रमणध्वनीवरुन इतर डॉक्टरांशी सल्ला मसलत करुन औषध देत असतात. यामुळे येथील पशुवैद्यकीय दवाखाना भ्रमणध्वनीवरुन चालत असल्याचे दिसून येत आहे.वेळेत योग्य उपचाराअभावी येथील दुधाळ जनावरे मुत्युमुखी पडत आहेत. दिवसाला २० ते २५ लिटर दूध देणारी कैलास खलाणे यांची ६० हजार रुपये किंमतीची गाय पोटात वासरु मेल्याने मुत्युमुखी पडली. तर काही जनावरे योग्य उपचाराअभावी कायमस्वरुपी आजारी पडत असल्याने त्याचा मोठा फटका येथील पशुपालकांना बसत आहे.येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला मालपुरसह इतरही गावे जोडली आहेत. यात चुडाणे, कलवाडे, अक्कलकोस, सुराय या गावांचा समावेश आहे. यात सुराय गावालाही दुग्ध व्यवसाय बऱ्यापैकी असल्यामुळे सहाजिकच जनावरांची संख्या तेथेही मोठी आहे.पावसाळ्याच्या दिवसात विषबाधा, लाय, खुरगट, पाय लंगडे होणे, खुरांचे आजार, शेळ्यामेंढयांना साथीचे आजार बळावत असतात. मात्र, डॉक्टरच उपलब्ध नाही तर करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला आहे. यात खाजगी गुरांच्या डॉक्टरांचे मात्र फावते आहे. पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आजारी गुरांवर उपचारासाठी गरजू पशुपालकांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागत आहे. यामुळे येथे अनुभवी पशुधन विकास अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.एकीकडे विविध वाणांचे तसेच भरपूर दुध देणाºया कालवडीच्या पैदाससाठी पशुपालकांनी कृत्रिम रेतन केले पाहिजे, असे सांगितले जाते तर दुसरीकडे कृत्रिम रेतन करणारे उपलब्ध होत नाही.यामुळे येथील दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मालपूर गावात लहान मोठ्या १२ डेअरी असून दोन दूध शितकेंद्र आहेत. जिल्हाभरातून येथे दुध एकत्रित करून शितकेंद्रात प्रक्रिया करुन गुजरात राज्यात पुरवठा केला जातो.मालपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुधन विकास अधिकारी, वर्णोपचार, परिचर अशी मंजुर पदे असून त्यापैकी पशुधन विकास अधिकारी व शिपाई, परिचर ही पदे सुमारे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. वर्णोपचार भ्रमणध्वनीवरून दवाखाना चालवत आहेत.येथील दवाखान्यातंर्गत २ हजार ४३६ मोठी जनावरे तर ७८० लहान जनावरे व ७८९ शेळ्यामेंढयांची जुनी नोंद आहे. यामुळे मालपूर येथे त्वरित पशुधन विकास अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या चंद्रकला पाटील, गोपाल डेअरीचे चेअरमन श्रावण अहिरे, सचिव बारीकराव मोरे, पशुपालक दामु अहिरे, ईश्वर वाघ आदींसह पशुपालकांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे