शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सीचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:24 IST

कोरोनाचा फटका : उपासमारीसह कर्ज फेडण्याचा सतावतोय विचार

धुळे : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे टॅक्सीचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ टॅक्सी बंद असल्याने हातावर पोट असणारे चालक कर्जबाजारी होत आहेत़ त्यामुळे टॅक्सीचालकांना शासनाने मदत करावी, अशी मागणी जयहिंद टॅक्सीचालक मालक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र आघाव यांनी केली आहे़जिल्ह्यात तब्बल शंभराच्या आसपास टॅक्सी चालक आणि मालक आहेत़ धुळे शहरात या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या हजाराच्या घरात आहे़ त्यात ७५ टक्के चालक आहेत जे भाडेतत्वाची टॅक्सी चालवतात़ टॅक्सी चालवून दररोज मिळणाºया कमाईवर त्यांचे घर चालते़ परंतु कोरोनाच्या लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासुन टॅक्सी बंद असल्याने या सर्वांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अनेकांनी बँक अथवा खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेवून टॅक्सी खरेदी केल्या आहेत़ तर काहींनी मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम, लग्न समारंभ यासह इतर कौटुंबिक गरजांसाठी बचत गटांचे कर्ज काढले आहे़ त्याचेही हप्ते थकले आहेत़ शिवाय हातात असलेला पैसा खर्च झाल्याने आता उधार उसनवार करुन घर चालवावे लागत आहे़ त्यामुळे टॅक्सीचालक कर्जबाजारी होत आहेत़ ज्यांच्या घराची परिस्थिती चांगली आहे किंवा कुटूंबात अन्य कुणीतरी कमावता व्यक्ती आहे, त्यांनाही झळा बसतच आहेत; परंतु केवळ टॅक्सीवर अवलंबून असणाऱ्यांची परिस्थिती सध्या खालावली आहे़टॅक्सी चालकांकडे दुर्लक्ष४धुळ्यातून शिरपूर, साक्री, शिंदखेडा, सोनगीर, दोंडाईचा यासह पारोळा, अमळनेर या ठिकाणी टॅक्सीचालक आपले वाहन घेऊन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात़ त्यांच्यावर शेकडो जणांचे पोट असल्याने त्यांच्यावर कोरोनामुळे नवे संकट उभे राहिलेले आहे़ रिक्षा चालकांना ज्याप्रमाणे मदतीसाठी प्रशासन धावले त्याप्रमाणे टॅक्सीचालकांसाठी देखील प्रशासनाने पुढे यायला हवे़ सध्या होत असलेली उपासमारी थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजे, दुर्लक्ष करु नये अशी मागणी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे