शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिकसे येथे बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:10 IST

पिंपळनेर : दोन बोकड, दोन मेंढ्यांचा पाडला फडशा, भितीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील चिकसे शिवारात सोमवारी पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बिबट्याने घराजवळील गोठ्यातील दोन बोकड, दोन मेंढया अशा चार जनावरांचा फडशा पाडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, तसेच लवकरच वनविभागामार्फत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.गावातील बापूजी त्र्यंबक अहिरे यांच्या घराजवळील वाडयातील गोठयात वन्यप्राण्याने हल्ला करीत तेथे बांधलेले दोन बोकड, दोन शेळ्यांचा फडशा पाडला. हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज वनविभागाने केलेल्या पाहणीनंतर वर्तविला. वन्यप्राणी रहिवासी भागात येऊन हल्ला करीत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिरे हे पहाटे साडेतीन वाजता उठले असता, त्यांना बोकड, बकºया मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण माळके, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. ११ आॅगस्ट रोजीही ताराचंद्र पाताळपुरे यांच्या गांगेश्वर शिवारात गाय, म्हैस, वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ला करीत त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. याच शिवारातील मातोश्री पोल्ट्री फार्मवरही बिबटयाने हल्ला करीत कोंबड्या खाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाळीमुळे ते शक्य झाले नाही. तरीही बिबट्याने जाळीवर पंजा मारल्याने भीतीने व आपसात चेंगरून ३८० कोंबड्या मृत झाल्या होत्या. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावून शिवार भयमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. यापूवीर्ही साक्री तालुक्यातील चिकसे, सामोडे, कासारे, कड्याळे, देशशिरवाडे, शेलबारी आदी भागात बिबटयाचा मुक्तसंचार नित्याचाच झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या भागात बिबटयाच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. नियमित घडणाºया अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मागणी करूनही पिंजरा लावण्यात आला नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.