शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘अक्कलपाडा’चे पाटचारीतून आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:07 IST

कापडणे ग्रामपंचायत : गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

कापडणे : येथे ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याचे स्रोत कमी झाल्याने गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहे. यासाठी अक्कलपाडाच्या आवर्तनातून सोनवद धरण भरणाऱ्या पाटचारीला पाणी सोडावे, अशी मागणी येथील ग्रामपंचायततर्फे निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.सध्या येथे पाच दिवसाआड नळांना पाणी येत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांची व महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. यापुढे उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यात खूपच भीषण टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे.पाणीटंचाईची दाहकता कमी होण्यासाठी पांझरा नदीला सोडण्यात आलेले अक्कलपाडाच्या आवर्तनातून सोनवद धरण भरणाºया पाटचारीला पाणी सोडावे.यासंदर्भात कापडणे ग्रामपंचायतचे सरपंच भटू गोरख पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या वतीने सोमवार १८ रोजी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे सोनवद पाटचारीला पाणी सोडण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.कापडणे ग्रामपंचायतच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील कापडणे गाव हे लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे. येथे पशुंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.पाऊस नसल्याने तीन ते चार वर्षापासून सततचा दुष्काळ असून कापडणे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.अशापरिस्थितीत अक्कलपाडा धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या आवर्तनातून सोनवद पाटचारीत पाणी सोडण्यात यावे. या पाण्यामुळे कापडणे गावाला पाणीपुरवठा करणारे जलस्रोतांची पाण्याची पातळी वाढून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.सदर निवेदनावर सरपंच भटू गोरख पाटील यांची स्वाक्षरी असून निवेदन देताना सरपंचांसह ग्रा.पं. सदस्य राजेंद्र रमेश माळी, उपसरपंच हर्षदा पाटील यांचे प्रतिनिधी भैय्या पाटील, सुमित माळी, मनोज मुरलीधर पाटील, प्रमोद गुलाबराव पाटील, भैया बोरसे आदी पदाधिकाºयांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कापडणे ग्रामपंचायतीचे गटनेते भगवान विनायक पाटील व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल रोहिदास पाटील हे जिल्हाधिकारी यांना भेटून कापडणे पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरा नदीच्या सोनवद प्रकल्पाच्या पाटचारीला पाणी सोडण्याबाबत मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे