शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांचा लस्सीवर ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:55 IST

उपाययोजनांपूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लस्सीवर ताव

धुळे : जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे़ पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मात्र तालुक्यात टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत उपाययोजनांपूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लस्सीवर ताव मारला. तसेच या बैठकीला उपस्थित राहण्यास पत्रकारांना मज्जावही करण्यात आला.जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यासाठी शासन स्तरावरून बोअर व विहीर अधिग्रहण, टॅकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याचे आदेश देण्यात आले आहे़त जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर आढावा बैठक घेण्याच्या सुचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहे़धुळे तालुका पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती सभापती अनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाºयांची बैठक घेण्यात आली़ यावेळी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते़आढावा घेत टॅकरची वाढविण्याच्या दिल्यात सूचनातालुक्याला दुष्काळाची झळ बसू लागल्याने ग्रामस्थांच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. नागरीकांना भेडसावणाºया पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ज्या गावांना टँकरने पाणी पूरवठा केला जातोय त्या गावांना पाणी कमी पडू लागल्याने त्याठिकाणी टँकरची संख्या दुप्पट करण्याचे निर्देश सभापती अनिता पाटील यांनी अधिकाºयांना दिले.नऊ गावांसाठी टँकरचा प्रस्तावतालुक्यातील अजंग, हेंकळवाडी (स), नवे भदाणे, बोधगाव, मोघण, सावळीतांडा, वेल्हाणे, निमगुळ व हेंद्रुण या गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत.नावरी, आर्णी आणि नंदाळे खु. या ठिकाणी अधिग्रहण सुरू आहे. ग्रामस्थांसाठी पाण्याचे नियोजन बाभूळवाडी येथील खाजगी विहीर, डेडरगाव तलाव, आर्णी येथील खाजगी विहीर आणि दिवाणमळा येथील खाजगी विहीरीवरून करण्यात आले आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या भिषण टंचाईला सामोरे जावे लागू नये़ यासाठी विविध उपाय योजना करण्याला प्राधान्य देण्यात याव्यात अशा सुचना सभापती अनिता पाटील यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.या गांवाना टॅकरद्वारे पाणीधुळे तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई आहे़ टंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे़ त्यात फागणे, वडजाई, तांडा कुंडाणे, बाबरे, जुन्नेर, सौंदाणे या गावांना दररोज पाणी पुरविण्यात येत आहे़ तर अंबोडे, मोरदड तांडा, मोरदड, धामणगाव, नगाव या गावांना खाजगी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे