शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कापडणे गावात ८ आॅगस्टपर्यंत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:57 IST

सरपंच बाधित : मालपूर येथे खासगी डॉक्टरसह तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे/मालपूर : कापडणे गावात ६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सरपंचांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून ८ आॅगस्टपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे खासगी डॉक्टरसह तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.मालपूरला चिंता वाढलीमालपूर येथे खासगी डॉक्टरांसह, पत्नी व ४०वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरांकडे औषधोपचार करुन गेलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, आलेल्या रुग्णांची त्यांच्याकडे कुठलीही नोंद नसल्यामुळे ट्रेसिंग करण्याच्या कामात मोठी अडचण निर्माण झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच या डॉक्टरांकडे ज्यांनी उपचार घेतले त्यांनी स्वत: पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारणी करुन बाधित रुग्णांचा परिसर सिल केला आहे. बाधित रुग्णांना दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोंडाईचा मंडळ अधिकारी एम.एम. शास्त्री यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. तर सरपंच मच्छिंद्र शिंदे यांनी गाव तीन दिवस संपुर्ण बंद राहिल, असे सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र पाटील, डॉ.शशीकांत आगळे, उपसरपंच जगदीश खंडेराय, माजी सरपंच हेमराज पाटील, ग्रामविकास अधिकारी एल.सी. पाटील, पोलीस पाटील बापू बागुल, सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक कुमार, ग्रामपंचायत सदस्य अजय साळवे, कैलास माळी आदी उपस्थित होते. शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मानसिंग वळवी यांनी कन्टेंमेन्ट झोनची पाहणी केली. गावात ९ टिमच्या साहाय्याने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. तर दुपारी संपर्कात आलेल्या ७ जणांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी नेऊन होम क्वॉरंटाईन करण्यात आले.कापडणेला दोन दिवसात ६ रुग्णकापडणे येथे २४ व २७ जुलै या दोनच दिवसात ६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तहसीलदार किशोर कदम यांनी संपूर्ण कापडणे गाव आहे कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले असून २५ जुलै ते ८ आॅगस्टपर्यंत संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे. कापडणे गावातील कंटेनमेंट क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहणार आहे. कंटेनमेंट क्षेत्र वगळून बफर झोन क्षेत्रात किराणा दुकाने, भाजीपाला, फळे विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. दरम्यान, सरपंच कोरोना बाधित झाल्याने ग्रामपंचायतीचा कारभार पाच दिवस ठप्प झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकाऱ्यांसह ४ बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य अशा २२ जणांचे धुळे जिल्हा रुग्णालयात २८ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आले आहेत. एकाच घरात तीन कोरोना बाधित आढळून आहेत. सरपंचासह त्यांच्या घरातील अन्य दोन जण बाधित आढळून आले आहेत. सरपंचांच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचा २८ स्वॅब घेण्यात आला आहे. धुळे गटविकास अधिकाºयांच्या आदेशान्वये २८ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत पाच दिवस ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत २८ रोजी गावात हायड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात आली आहे. यापूर्वी देखील सात वेळेस गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आलेली आहे.