शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपसरपंचासह दोन्ही ग्रामसेवकांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:59 IST

शिरपूर : थाळनेर ग्रामपंचायत अपहार प्रकरण

शिरपूर : तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामपंचायतीत लाखो रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी सरपंचांचे पती तथा शिसाकाचे माजी व्हाईस चेअरमन एकनाथ जमादार यांच्यासह तत्कालीन दोन्ही ग्रामसेवकांना जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती़ पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे ५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती ए़बी़ जाधव यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़तत्कालीन सरपंच अरूणाबाई एकनाथ जमादार, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ काशिनाथ जमादार, ग्रा़पं़ सदस्य दिनकर आनंदराव पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजी माधव पवार, ग्रामविकास अधिकारी डी़आऱ बोरसे, पंचायत समिती विस्तार अधिकारी आऱडी़ महिंदळे, तत्कालीन गटविकास अधिकारी भरत कोसोदे अशांनी सन २०१२ ते २०१७ या कालावधीत थाळनेर ग्रामपंचायतीत शासनाकडून विविध विकास कामांसाठी मिळालेल्या ५५ लाख ३ हजार ८४८ रूपयांचा निधीचा संगनमताने अपहार केला होता़ या संदर्भात कुबेरसिंग जयपालसिंग जमादार यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता़चौकशीअंती ग्रामविकास अधिकारी शिवाजी पवार व आबा बोरसे यांना अटक करण्यात आली होती़ त्यानंतर माजी उपसरपंच एकनाथ जमादार यांनाही अटक करून ५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते़ ५ रोजी तिघांना शिरपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे तिघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़ फिर्यादीतर्फे अ‍ॅड़अमित जैन यांनी कामकाज पाहिले़तत्कालीन महिला सरपंच फरार४या गुन्ह्यातील तत्कालीन सरपंच अरूणाबाई एकनाथ जमादार व सदस्य दिनकर पाटील हे दोन्ही फरार आहेत़४या गुन्ह्यातील तत्कालीन गटविकास अधिकारी भरत कोसोदे, ग्रामविस्तार अधिकारी आऱडी़ महिंदळे या दोघांना उच्च न्यायालयाने तर ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे