शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर पवार यांना नातेवाईकासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:43 IST

धुळे लाचलुचपत विभाागाची कारवाई : २५ हजाराची लाच घेतली

ठळक मुद्देतक्रारदाराच्या बाजुने चौकशी अहवाला पाठविण्यासाठी ४० हजाराची मागणीतडजोडीअंती २५ हजार रूपये देण्याचे ठरले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून नातेवाईकास पकडले

आॅनलाईन लोकमतधुळे : पाच वर्षापूर्वी बांधकाम विभागाच्या अभियंत्याला लाच घेतांना पकडण्यात आले होते. त्या प्रकरणाचा चौकशी अहवाल अभियंत्याच्या बाजुने पाठविण्यासाठी २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी   मंत्रालयातील सहसचिव  प्रभाकर बाबुराव पवार (वय ४८, रा. विजयनगर, कल्याणपूर्व)  यांना त्यांच्या नातेवाईकासह  बुधवारी अटक करण्यात  आल्याची माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत शत्रुघ्न माळी यांनी सांगितले की, तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावर कार्यरत होते. त्यांना  धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना रंगेहात पकडले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांची महाराष्टÑ शासनामार्फत उच्चस्तरावर विभागीय चौकशी सुरू होती. ही चौकशी मंत्रालयातील वर्ग-१चे अधिकारी सहसचिव व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी प्रभाकर बाबुराव पवार यांच्या मार्फत सुरू होती.चौकशी सुरू असतांना पवार यांनी तुमच्या बाजुने महाराष्टÑ शासनास चौकशी अहवाल पाठविला असून, त्याबद्दल तक्रारदाराकडे ४० हजार रूपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने ७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे पवार यांच्याविरूद्ध तक्रार नोंदविली.तडजोडीअंती  पवार यांनी आपले नातेवाईक प्रशांत गवळी (२७, रा. राजपूत कॉलनी, देवपूर,धुळे) याच्याकडे २५ हजार रूपये देण्यास तक्रारदारास सांगितले.त्यानुसार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता तक्रारदाराकडून २५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना प्रशांत गवळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गणपती मंदिराजवळ रंगेहात पकडले.त्यानंतर प्रभाकर पवार हे नाशिक येथून त्यांच्या राहत्या घरी ठाणेपाडा (जि. नंदुरबार) येथे जात असतांना मध्यरात्री त्यांना पकडले. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे आणण्यात आले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभाकर पवार व प्रशांत गवळी यांना अटक करण्यात आली आहे.प्रभाकर पवार राजपत्रित अधिकारीप्रभाकर पवार हे १९९६ च्या राज्यसेवा बॅचचे अधिकारी असून, ते महाराष्टÑ मंत्रालयीन राजपत्रित अधिकारी आहे. शासनाने त्यांची अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने भ्रष्ट अधिकाºयांविरूद्ध लाच घेतांना झालेल्या कार्यवाहीबाबतची विभागीय चौकशी करण्यासाठी खास नियुक्ती केली होती. परंतु अशा राजपत्रित अधिकाºयानेच चौकशी सुरू असलेल्या अधिकाºयाकडे लाचेची मागणी करून, त्याच्याबाजुने शासनाला दिशाभूल करणारा अहवाल पाठविला. या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.