शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद ...

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही ‘अ’ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील तेथे इतर सहकारी संस्थेस ‘ब’ वर्ग सभासद करून खरेदीचे काम देण्यात येईल. मात्र, ही संस्था किमान दोन वर्षांपूर्वी नोंदणी झालेली असावी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती, एफपीओ यांनाही केंद्र देता येते.

खरेदी करणाऱ्या संस्थेकडे साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहायक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला, मॉईश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक चालविण्याची क्षमता असलेला जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळण्याकरिता प्रशिक्षित असलेला सेवक वर्ग, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा. पुढील बाबींकरिता सहाय्यक निबंधक यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे. त्यात वखार महामंडळाच्या गुदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गुदाम असण्याबाबत, अन्नधान्य, कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी-विक्रीचा किमान एक वर्षाचा अनुभवाचे प्रमाणपत्र, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे, काळ्या यादीत, अपहार, फौजदारी गुन्हा यासंबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

संस्थेने द्यावयाच्या कागदपत्रांमध्ये मागील तीन वर्षांचे सनदी लेखापाल/शासकीय लेखापरीक्षक यांनी साक्षांकित केलेली ताळेबंद पत्रके सादर करावीत. पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे दहा लाख रुपयांचे खेळते भांडवल असल्याबाबतचे बँक प्रमाणपत्र/बँक पासबुक नोंद (ज्या संस्थेला पणन महासंघाकडून अनुषंगिक व इतर खर्चापोटी रक्कम देय असल्यास त्याचा समावेश करण्यात यावा), आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चिती केलेले स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (ॲफेडेव्हिट), संस्थेकडून खरेदी-नोंदणीमध्ये गैरव्यवहार, अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही ही अट मान्य असल्याचे संमतीपत्र.

जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी द्यावयाची प्रमाणपत्रे, मागील वर्षीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये ऑफलाइन खरेदी, गैरव्यवस्थापन न केल्याबाबतचा दाखला, खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, ‘अ’ किंवा ‘ब’ वर्ग सभासद आहे किंवा नाही, नसल्यास ‘ब’ वर्गाचा प्रस्ताव सादर केला आहे काय आदी.