शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

७६४ सिलिंडर देणारा पॉझिटिव्ह तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST

महानगरात दोन ते अडीच लाखांहून अधिक घरगुती गॅस वापरणाऱ्यांची संख्या आहे. या सर्वांना भारत गॅस, एचपी, इंडेन गॅस अशा ...

महानगरात दोन ते अडीच लाखांहून अधिक घरगुती गॅस वापरणाऱ्यांची संख्या आहे. या सर्वांना भारत गॅस, एचपी, इंडेन गॅस अशा कंपन्यांच्या माध्यमातून घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. घरोघरी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्यांची संख्या ५०० च्या जवळपास आहे. यातील काही जण बाधित झाले होते. परंतु, बहुतेकांचे लसीकरण अद्यापही करण्यात आले नाही. यांना दररोज अनेकांच्या घरी जाऊन घरपोच सिलिंडरचा पुरवठा करावा लागत असल्याने अनेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, तिसऱ्या लाटेच्या पूर्वी लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सिलिंडर सॅनिटाईज केले का?

महानगरात गॅस वितरण करणाऱ्या डिलिव्हरी बाॅयजवळ सॅनिटाइजर दिसून येत नाही किंवा सिलिंडर देतानाही सिलिंडरला सॅनिटाईज केले जात नाही. त्यामुळे घरातील मंडळी किचनमध्ये सिलिंडर ठेवण्याची विनंती त्याला करीत असतात. नेहमीचेच संबंध असल्यामुळे डिलिव्हरी बाॅयदेखील किचनपर्यंत सिलिंडर नेऊन देतो. परंतु, सिलिंडर सॅनिटाईझ करून घेण्याची तसदी कोणीही घेत नाही.

अनेक जण आढळले पॉझिटिव्ह

शहरात गॅस घरपोच करणाऱ्यांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. त्यापैकी काही जणांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु, आजपर्यंत अनेकांना लस उपलब्ध झालेली नाही. घरोघरी सेवा देणाऱ्या या वितरकांसह गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जबाबदारी कुणाची?

जिल्ह्यात गॅस वितरित करणाऱ्या तसेच इतर जीवनावश्यक साहित्य, खाण्याचे पदार्थ व इतर सेवा घरपोच देणाऱ्या वितरकांना, डिलिव्हरी बॉयला लस देण्याची जबाबदारी कुणाची आहे, तसेच त्यांची वेळोवेळी कोरोना तपासणी केली जाते काय, असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत.

मास्क घालूनच सिलिंडरचा पुरवठा करीत असतो. आम्ही अनेकांच्या संपर्कात येत असल्याने आम्हाला लसीकरण करणे गरजेचे होते. मात्र १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद झाल्याने माझे लसीकरण व्हायचे आहे.

- गॅस वितरक